गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्रेष्ठ आहे ब्रह्म मुहूर्तात उठणे

रात्रीच्या अंतिम प्रहराला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. सूर्योदयाहून सुमारे दीड तास आधीची वेळ ब्रह्म मुहूर्त मानली जाते. ऋषी मुनींनी या मुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी निद्रा त्यागून उठणे सर्वोत्तम मानले गेले आहे. ब्रह्म मुहूर्तात झोपून उठल्याने सौंदर्य, बळ, विद्या, बुद्धी आणि आरोग्याची प्राप्ती होते.
 
ब्रह्ममुहूर्तेया निद्रा सा पुण्यक्षयकारिणी
अर्थात ब्रह्म मुहूर्ताची झोप पुण्याचे नाश करणारी असते.
 
वैज्ञानिक शोधात ज्ञात झाले आहे की ब्रह्म मुहूर्तात वायू मंडळ प्रदूषण रहित असतं. या काळात वायू मंडळात ऑक्सिजन अर्थात प्राणवायूचे प्रमाण सर्वाधिक असतं जी फुफ्फुसाच्या शुद्धीसाठी आवश्यक आहे. शुद्ध वायू मिळाल्याने मन, मस्तिष्कदेखील निरोगी राहतं. आयुर्वेदानुसार ब्रह्म मुहूर्तात पायी चालण्याने शरीरात संजीवनी शक्तीचा संचार होतो. म्हणूनच या वेळेत वाहणार्‍या वायूला अमृततुल्य म्हटले गेले आहे. याव्यतिरिक्त हा काळ अध्ययनासाठीदेखील सर्वोत्तम मानला गेला आहे कारण रात्रीच्या झोपेनंतर शरीर आणि मस्तिष्कात स्फूर्ती असते.