शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (22:49 IST)

चाणक्य नीति : अशा घरांमध्ये नसते पैशाची कमतरता

सध्याच्या काळात इच्छा आणि गरज पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज आहे. पैसा मिळवण्यासाठी माणूस रात्रंदिवस मेहनत करतो. मात्र अनेक वेळा लाख प्रयत्न करूनही पैसा जमवण्यात यश येत नाही. पैसा वाचला तरी तो अनेक कारणांमुळे खर्चही होतो. निती शास्त्रात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की कोणत्या घरात लक्ष्मी देवी वास करते.
 
चाणक्य नीतिनुसार ज्या घरातील सदस्य आपापसात वाद निर्माण करतात आणि अशांततेचे वातावरण निर्माण करतात. अशा घरांमध्ये माता लक्ष्मी वास करत नाही. सुख-शांतीच्या ठिकाणी मां लक्ष्मी वास करते.
 
चाणक्य नीतीनुसार ज्या घरांमध्ये पती-पत्नीमध्ये वैमनस्य असते, त्या घरांमध्ये पैशाशी संबंधित समस्या निर्माण होतात. चाणक्य सांगतात की ज्या घरांमध्ये पती-पत्नी एकत्र येत नाहीत, त्या घरांमध्ये माता लक्ष्मीला स्थान नसते. चाणक्य सांगतात की ज्या घरांमध्ये स्त्रियांचा आदर होत नाही, तिथे लक्ष्मीचा वास नाही. ज्या घरात पती-पत्नीचे सौहार्दपूर्ण संबंध असतात, त्या घरात माता लक्ष्मीची कृपा वास करते.
 
चाणक्य नीतीनुसार जो व्यक्ती परोपकाराचे काम करतो, त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. जे आपल्या कमाईतील काही भाग दान करतात, त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही.