मंगळवार, 5 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : सोमवार, 9 मे 2022 (16:21 IST)

बाळाचा विचार करतायत ? तर मग ब्लड शुगर टेस्ट नक्की करून घ्या

pregnancy
गेले दोन वर्ष संपूर्ण जग एका अभूतपूर्व जैविक महामारीचा त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करतो आहे, मात्र या दरम्यान,तितक्याच गंभीर समस्या आणि आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या इतर जुन्या व्याधींकडे आपला कानाडोळा होतो आहे. आधीपासून अस्तित्वात असलेले हे विकार विभिन्न प्रकारात आरोग्याला इजा पोहोचवत असतात.
 
या सर्व विकारांमध्ये मधुमेह समस्या अग्रणी स्थानावर आहे. उच्च मधुमेही लोकसंख्ये(लॅन्सेट) च्या अव्वल तीन देशांमध्ये भारताचादेखील समावेश आहे. जागतिक मधुमेही संघटना (आयडीएफ) नुसार, २०१५ मध्ये भारतात २०-७० वयोगटातील मधुमेहाची अंदाजे प्रकरणे सुमारे ७ कोटी इतकी होती, आणि ही संख्या चिंताजनक वेगाने वाढत चालली आहे. याचा अर्थ मधुमेह भारतीय लोकसंख्येचा महत्वपूर्ण भाग असलेल्या प्रजनन वयोगटावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतो आहे.
 
यामध्ये सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, मधुमेहामुळे स्त्री आणि पुरुष दोघांच्या प्रजनन क्षमता आणि पुनरुत्पादक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच जर तुम्ही प्रजनन वयोगटात मोडत असाल,
किंवा गर्भधारणेची योजना आखत असाल तर साध्या रक्त परीक्षणाद्वारे तुम्ही तुमच्या शरीरातील साखरेची पातळी तपासणे गरजेचे आहे.
 
मधुमेह बद्दल सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे 
 
शरीर ऊर्जा निर्माण करण्यासाठी साखर, स्टार्च आणि अन्य पदार्थांद्वारे इन्सुलिनची निर्मिती करत असते. मात्र, काहीवेळा स्वादुपिंड हवे तितके इन्सुलिनची निर्मिती करू शकत नाही, म्हणजेच शरीरात साखर किंवा ग्लुकोज तसेच राहिल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास संबंधित व्यक्ती मधुमेहास कारणीभूत ठरतो, ज्यावर उपचार न केल्यास, अनेक समस्या निर्माण होतात, काहीवेळा जीवघेणे परिणामदेखील उद्भवू शकतात.
 
मधुमेहाचे विभिन्न प्रकार असून, ते कोणत्याही वयात होऊ शकतात, म्हणूनच या संबंधित लक्षणांवर लक्ष ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे.
 
मधुमेह प्रकार १ मध्ये तुमची रोप्रतिकारक शक्ती कमी होऊन, स्वादुपिंडात इन्सुलिनची निर्मिती करणाऱ्या पेशी सक्रिय काम करत नाही. हे सामान्यतः लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये निदान केले जाते आणि दररोज त्यांना इन्सुलिनचा डोस घ्यावा लागतो.
मधुमेह प्रकार २ मध्ये तुमचे शरीर इन्सुलिनची निर्मिती करू शकत नाही. हे सामान्यतः मध्यम आणि वृद्ध वयोगटातील लोकांमध्ये पाहिले जाते.
गर्भावस्थेतील मधुमेह सामान्यतः गरोदर महिलांना होण्याची शक्यता असते, मात्र बाळाच्या जन्मानंतर तो निघून जातो.
मात्र त्यानंतर, अशा महिलांना पुढे जाऊन मधुमेह प्रकार २ होण्याचा धोका जास्त असतो.
या सर्व गोष्टीं पाहिल्या तर, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, पहिल्या दोन प्रकारचे मधुमेह प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतात, तर गर्भावस्थेतील मधुमेहाचा परिणाम थेट गर्भधारणेवरच होऊ शकतो.
 
ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे का?
 
जर तुम्ही बाळ होण्याचे नियोजन करत असाल किंवा अनेक काळ गर्भधारणेचा प्रयन्त करून देखील तुम्ही गरोदर राहत नसाल तर एक साधारण रक्तचाचणी द्वारे तुमच्या रक्तातील साखरेचा स्तर जाणून घेत, समस्याचे निवारण करू शकता. खूप कमी लोकांना माहिती आहे की मधुमेह पुरुष प्रजननक्षमतेमध्ये तसेच स्त्री प्रजननक्षमतेमध्ये व्यत्यय आणू शकतो, ज्यामुळे बाळाला जन्म देण्याच्या तुमच्या योजना अयशस्वी होतात. मधुमेह पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर परिणाम करतो, तसेच प्रजनन क्षमतेवर देखील थेट प्रभाव पाडतो. मधुमेह असलेल्या सुमारे ५० टक्के पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास होतो. तसेच रेट्रोजेड इंजेक्युलेशन देखील होऊ शकते.
मधुमेह टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन आणि पुरुष शुक्राणूंच्या गुणवत्ता कमी करतो. याचा अर्थ मधुमेह शुक्राणूंच्या डीएनएला नुकसान पोहोचवत, क्षतिग्रस्त डीएनएचे मोठ्या प्रमाणात विखंडन करते, अश्या विखंडित DNA च्या शुक्राणूंद्वारे फलित झालेले अंडे निरोगी भ्रूण बनण्याची शक्यता कमी असते. ज्याचा गर्भाशयाच्या रोपण क्षमतेवर विपरीत परिणाम होतो आणि गर्भपात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होतो. याचा परिणाम IVF प्रक्रियेच्या दरांवर देखील होऊ शकतो. 
प्रजनन वयोगटातील बहुतांश स्त्रियांना वरील दोन प्रकारचे मधुमेह किंवा गर्भावस्थेतील मधुमेह होतो, त्यामुळे वेळीच योग्य काळजी घेत आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी सक्रिय पावले उचलणे आवश्यक आहे. १९८० ते २०१४ (लॅन्सेट) दरम्यान भारतातील महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण 80 टक्क्यांनी वाढले आहे. प्रकार १ मधुमेह असलेल्या महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी सामान्य आहे, तर प्रकार २ मधुमेहाने ग्रस्त महिलांना लठ्ठपणा आणि पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हरीयन सिंड्रोम) सारख्या समस्या असतात.
अनियंत्रित मधुमेहामुळे महिलांना ओव्हुलेशनच्या समस्या आणि ग्रीवा-योनिमार्गाच्या संसर्गाचा धोका उद्भवू शकतो. तसेच गर्भवती मातांमध्ये गर्भपात आणि मृत जन्माचा धोका तसेच जन्मजात दोष असलेली नवजात बालके यांसारख्या गुंतागुंत समस्या निर्माण होऊ शकतात. 
 
मधुमेह आणि गर्भधारणा
मधुमेह ही क्रोनिक स्थिती जरी असली तरी सुदैवाने ती सोप्या मार्गाने हाताळली जाऊ शकते. सकस आहार घेणे, नि यमित व्यायाम करणे, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेटफॉर्मिन किंवा इंसुलिन यांसारख्या औषधांचा इंजेक्शन किंवा पंपच्या माध्यमाद्वारे वापर करून मधुमेह नियंत्रित केला जाऊ शकतो. 
 
जर तुम्हाला प्रकार १ किंवा २ चा मधुमेह असल्याचे निदान झाले आहे, आणि तुम्ही बाळासाठी करत असाल तर काही
मार्गांचा अवलंब करून तुम्ही तुमची गर्भधारणा यशस्वी करण्याचा प्रयत्न करू शकता. मधुमेहीग्रस्त महिलेची निरोगी गर्भधारणा नक्कीच शक्य आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल.
 
यासंदर्भात तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, जे तुम्हाला इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट किंवा प्री कॉन्सेप्शन केअर टीमकडे शिफारस करू शकतात. साधा मधुमेह सोप्या मार्गाने हाताळून प्रजनन समस्या दूर करता येतात. मात्र तसे नसल्यास, In Vitro Fertilization आणि Intracytoplasmic Sperm Injection (IVF + ICSI) सारख्या पर्यायांचा विचार करू शकता. तसेच आपल्या शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांना सामान्य श्रेणीत आणणे केवळ गर्भधारणेची शक्यता वाढवत नाही तर गर्भपात, जन्म दोष आणि मृत्यू जन्माचा धोका कमी करण्यास देखील मदत करते. गर्भावस्थादरम्यान शरीर ग्लुकोजच्या वापरामध्ये बदल घडवून आणत असेल, तर त्याप्रमाणे तुमच्या मधुमेहावरील सुरु असलेला उपचार देखील बदलणे आवश्यक असते. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीकडे बारकाईने लक्ष ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. शेवटचे आणि खूप महत्वाचे म्हणजे, मधुमेहावर उपचार करण्यासाठी दीर्घकालीन जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी, निरोगी आहार आणि वजन नियंत्रित करणे, नियमित व्यायाम करणे, तंबाखू पासून लांब राहणे, तसेच तणाव मुक्त जीवनशैली आत्मसात करण्यासारखे काही यशस्वी  गुरुकिल्ल्या आहेत, ज्या तुम्हाला केवळ गर्भधारणेच्या तयारीसाठी नव्हे तर संपूर्ण गर्भधारणेदरम्यान आणि बाळाच्या जन्मानंतरही तुमची प्रकृती सर्वोत्तम असल्याची खात्री देईल. चांगले आरोग्य. ही एक भेट आहे जी तुमची आणि तुमच्या बाळाची आयुष्यभर सेवा करेल.  

DR HRISHIKESH PAI