रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 11 डिसेंबर 2024 (11:08 IST)

मोक्षदा एकादशीला सुख-समृद्धी मिळवण्यासाठी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा

मोक्षदा एकादशी नावाप्रमाणे, मोक्ष देणारी एकादशी. मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपासना व व्रत केल्याने पाप नष्ट होऊन त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो, असे म्हटले जाते. एवढेच नाही तर मोक्षदा एकादशी व्रत केल्याने पितरांनाही बैकुंठ प्राप्त होते असे सांगितले जाते. 
 
या दिवशी उपवास करून भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. प्रत्येक मंत्राचा एक उद्देश असतो, त्याचा जप केल्याने त्याची सिद्धी होते. तुळशीच्या जपमाळाने भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करण्याचा सल्ला दिला जातो. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. मंत्राचा उच्चार करताना शरीर, मन आणि शब्द यांचे योग्य उच्चारही आवश्यक आहेत. चला जाणून घेऊया विष्णूच्या मंत्रांबद्दल.
 
विष्णु मंत्र विष्णु मंत्र
1. संपत्ती आणि समृद्धीसाठी
ओम भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि।
ओम भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि।
 
2. विष्णु गायत्री मंत्र: सुख आणि शांतिसाठी
ऊं नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
 
3. श्री विष्णु भगवते वासुदेवाय मंत्र
ओम नमोः भगवते वासुदेवाय॥
 
4. विष्णु कृष्ण अवतार मंत्र:
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे।
हे नाथ नारायण वासुदेवाय।।
 
5. विष्णु रूपं पूजन मंत्र
शांताकारम भुजङ्ग शयनम पद्म नाभं सुरेशम्।
विश्वाधारं गगनसद्र्श्यं मेघवर्णम शुभांगम्।
लक्ष्मी कान्तं कमल नयनम योगिभिर्ध्यान नग्म्य्म।
वन्दे विष्णुम भवभयहरं सर्व लोकेकनाथम्।
 
6. मंगल श्री विष्णु मंत्र
मङ्गलम् भगवान विष्णुः, मङ्गलम् गरुणध्वजः।
मङ्गलम् पुण्डरीकाक्षः, मङ्गलाय तनो हरिः॥
 
विष्णूच्या मंत्रांचा जप करण्यापूर्वी त्यांची पूजा केली पाहिजे. विष्णूला तुपाचा दिवा लावावा. मंत्राच्या जपासाठी एकाग्र होणे आवश्यक आहे.