शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 22 नोव्हेंबर 2018 (00:03 IST)

कार्तिकस्वामी दर्शन....

..श्रीशिवपार्वतीचे ज्येष्ठ चिरंजीव, श्रीगजानानचे ज्येष्ठ भ्राता श्रीकार्तिकेय/कार्तिकस्वामी यांच्या दर्शनाचा योग यंदा दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ रोजी (गुरुवार) संध्याकाळी ५ वाजून ५२ मिनिटांपासुन ते दुसरे दिवशी म्हणजे शुक्रवार (२३ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजून ९ मिनीटांपर्यंत आहे. “कार्तिक महिना, पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र”या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृत्तिका नक्षत्र असेल तेव्हा श्रीकार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा शुभकाल मानला जातो. श्रीकार्तिकेय ये बल,बुध्दी,साहस आणि यशस्वितेचे प्रतिक मानले गेले आहे. तो शिवगणांचा सेनापती मानला जातो. त्यामुळे ज्ञानसंपन्नता, यशस्विता आणि इतर सर्व शुभगुणांचे अधिपत्य श्रीकार्तिकेयाकडे आहे. वर वर्णन केलेल्या पर्वणीकाळात त्याचे दर्शन घेणे हे "धनसंपत्तीकारक"ही मानले गेले आहे. कार्तिकस्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आगामी सबंध वर्ष हे धनलाभाचे जातेच असा माझ्यासह अनेकांचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. आर्थिक अडचणीत, कर्जात बुडालेल्या व्यक्तींनी या पर्वणीकाळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाचे जाते असा समज आहे. श्रध्दा असेल तर हा अनुभव नक्कीच येतो. विशेष म्हणजे इतरवेळी कार्तिकेयाचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार सर्व स्त्रीयांना वर्ज्य असले तरी या पर्वणीकाळात स्त्रीयादेखील कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात हे विशेष आहे. 
 
...कार्तिकेय हा ब्रह्मचारी असल्याने दर्शनाचे वेळी त्यांना दंड, पाण्याने भरलेला कमंडलु, २७ रुद्राक्षांची माळ, कमळाचे फुल (किंवा कोणतीही पांढरी फुले) आणि दर्भ अर्पण करण्याची प्रथा आहे. अनेक भक्त प्रतिकात्मक पातळीवर सोने (सुवर्ण-Gold)देखील अर्पण करतात ( हे प्रतिकात्मक अर्पण असल्याने ते किमान १०० मिलीग्रॅम असले तरी चालते). दर्शनाचे वेळी अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेऊन, वरीलपैकी शक्य असतील त्या वस्तुंचे अर्पण करावे आणि अपेक्षित प्रार्थना करावी. दर्शनाचे वेळी कार्तिकस्वामींच्या २८ नावांचा उल्लेख असलेले "प्रज्ञाविवर्धन स्तोत्रा"चे पाठ केल्यास अधिक उत्तम. विशेषत: विद्यार्थीदशेतील मंडळींनी प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ करुन कार्तिकेयाचे दर्शन घेणे अधिक लाभदायक मानले गेले आहे. (विद्याप्राप्ती व शैक्षणिक यशासाठी हे पर्वणी दर्शन खुप शुभ असते)
 
....सकाळी उठुन स्नान, दैनंदिन पुजाअर्चा आटोपुन, आईवडील, गुरुंना नमस्कार करुन, शुचिर्भुतपणे दर्शन घ्यावे. वरीलपैकी शक्य असतील त्या गोष्टी अर्पण कराव्यात, प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ जमतील तसे करावेत. त्या दिवशी मद्यपान, मांसाहार अर्थातच कटक्षाने वर्ज्य करावा. ब्रह्मचर्यपालनही करावे…दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ रोजी दर्शन पर्वणीकाळ हा संध्याकाळी ५.५२ ते दुसरे दिवशी सकाळी ११.०९ पर्यंत आहे तरी त्यातही शुभ चौघडीया पुढील आहेत (२२ रोजी संध्याकाळी ५.५५ ते ७.३२, २३ नोव्हेंबर सकाळी ८.१८ ते ११.०३ )  
 
प्रज्ञाविवर्धन स्तोत्र...
 
अस्य श्रीप्रज्ञाविवर्धन-स्तोत्र-मंत्रस्य सनत्कुमारऋषि:।
स्वामी कार्तिकेयो देवता। अनुष्टुप् छंद:।
मम सकल विद्यासिद्ध्यर्थं जपे विनियोग:।
 
श्रीस्कंद उवाच।।
 
योगीश्वरो महासेन: कार्तिकेयोSग्निनन्दन:।
स्कंद:कुमार: सेनानी: स्वामिशंकरसंभव: ।।१।। 
गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वज:। 
तारकारिरुमापुत्र: क्रौंचारिश्च षडानन: ।।२।। 
शब्दब्रह्मसमुद्रश्च सिद्ध:सारस्वतो गुह:। 
सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षफलप्रद: ।।३।।
शरजन्मा गणाधीशपूर्वजो मुक्तिमार्गकृत। 
सर्वागमप्रणेताच वांछितार्थप्रदर्शन: ।।४।। 
अष्टाविंशति नामानि मदीयानीति य: पठेत्।
प्रत्यूषं श्रद्धयायुक्तो मूको वाचस्पतिर्भवेत् ।।५।। 
महामंत्रमयानीति मम नामानुकीर्तनम्। 
महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा ।।६।।
 
|| इति श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्रं संपूर्णम्।
@ (सचिन मधुकर परांजपे)