मंगळवार, 10 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (08:32 IST)

Vivah Upay हा एक उपाय प्रबोधिनी एकादशीला घरातील एका कोपर्‍यात करा, विवाह योग घडून येईल

marriage
Dev uthani gyaras upay: देव उठनी एकादशी व्रत पाळल्याने विवाहाची शक्यता निर्माण होते : प्रबोधिनी एकादशीच्या दुसर्‍या दिवसापासून तुळशीविवाहारंभ होत आहे तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालणार्‍या या उत्सव दरम्यान व्रत पाळल्यास विवाहातील अडथळे दूर होतात आणि विवाहाची शक्यता वाढते.
 
एकादशीला लवकर लग्न होण्यासाठी करा उपाय : या दिवशी पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करून शालिग्राम यांना पंचामृताने स्नान घालून त्यावर चंदन लावावे. यानंतर त्यांना पिवळ्या आसनावर बसवावे आणि त्यांना आपल्या हातांनी तुळशी अर्पण करावी आणि लग्नासाठी तुमची इच्छा सांगावी. अशा प्रकारे लवकरच लग्न होण्याची शक्यता आहे.
 
देव उठनी एकादशीला घराच्या उत्तर किंवा ईशान्य भिंतीवर हळदीने स्वस्तिक बनवावे आणि त्यावर अक्षता लावाव्यात. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी पूजन करताना हळदीने स्वस्तिक बनवावे. सर्व प्रकारच्या सामान्य पूजा किंवा हवनात कुमकुम किंवा रोळीने स्वस्तिक बनवले जाते.