शुक्रवार, 13 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (07:48 IST)

Dev uthani ekadashi 2024: प्रबोधिनी एकादशीला चुकूनही या 11 गोष्टी करू नका, नाहीतर भोगावे लागणार

Dev Uthani Ekadashi 2024 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, देवउत्थान/देव उठनी / कार्तिकी एकादशी /प्रबोधिनी एकादशी ही अत्यंत पवित्र तिथी मानली जाते. ही तिथी अतिशय शुभ आहे, म्हणून या दिवशी शरीर, मन आणि धनाची पवित्रता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्या मनात, कृती आणि शब्दांची थोडीशी चूकदेखील आयुष्यभर समस्या निर्माण करू शकते.प्रबोधिनी एकादशीच्या काळात हे कार्य निषिद्ध आहे.चला येथे जाणून घेऊया कोणती 11 कामे जी शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी अजिबात करू नयेत...
 
1. दात घासणे: एकादशीला दात घासणे देखील निषिद्ध आहे. या मागे कोणतेही धर्मशास्त्रीय कारण नाही.
 
2. रात्री झोपणे: एकादशीची संपूर्ण रात्र जागृत राहून भगवान विष्णूची पूजा करावी. या रात्री झोपू नये. भगवान विष्णूच्या प्रतिमेजवळ / चित्राजवळ बसून भजन आणि कीर्तन करतांना जागरण केले पाहिजे, यामुळे भगवान विष्णूचे असीम आशीर्वाद प्राप्त होतात.
 
3. पान खाणे: एकादशीच्या दिवशी पान खाणे देखील निषिद्ध मानले जाते. पान खाल्ल्याने मनातील रजोगुणाची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी व्यक्तीने पानाचे सेवन करू नये नेहमी चांगले विचार ठेवून भगवंताच्या भक्तीकडे लक्ष द्यावे.
 
4. जुगार खेळणे: जुगार हे सामाजिक वाईट मानले जाते. या दिवशी जो व्यक्ती जुगार खेळतो, त्याचे कुटुंबही नष्ट होते. कोणत्याही ठिकाणी जेथे जुगार खेळला जातो, तेथे अधर्माचे राज्य होते. अशा ठिकाणी अनेक दुष्कृत्ये निर्माण होतात. म्हणून, एखाद्याने आजच नव्हे तर कधीही जुगार खेळू नये.
 
5. इतरांची निंदा करणे किवा वाईट बोलणे: निंदा म्हणजे इतरांबद्दल वाईट बोलणे. असे केल्याने इतरांबद्दल कटु भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी इतरांचे वाईट न बोलता केवळ भगवान विष्णूचेच ध्यान करावे.
 
6. निंदा नालस्ती करणे  : निंदा नालस्ति केल्यामुळे आदर कमी होऊ शकतो. कधी कधी अपमानाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे केवळ एकादशीलाच नाही तर इतर दिवशीही कोणाबद्दल निंदा-नालस्ती  करू नये.
 
7. चोरी करणे: चोरी हे पापी कृत्य मानले जाते. चोरी करणाऱ्या व्यक्तीकडे कुटुंबात आणि समाजात द्वेषाने पाहिले जाते. त्यामुळे केवळ एकादशीच नव्हे तर इतर दिवशीही चोरीसारखे पाप करू नये.
 
8. खोटे बोलणे: खोटे बोलणे ही वैयक्तिक वाईट गोष्ट आहे. खोटे बोलणाऱ्यांना समाजात आणि कुटुंबात योग्य मान मिळत नाही. त्यामुळे केवळ एकादशीलाच नव्हे तर इतर दिवशीही खोटे बोलू नये.
 
9. हिंसा करणे: एकादशीच्या दिवशी हिंसा करण्यास मनाई आहे. हिंसा ही केवळ शरीराची नाही तर मनाचीही आहे. त्यामुळे मनात विकृती निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शरीर किंवा मनाची कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये.
 
10. राग करणे: एकादशीला राग करू नये, त्यामुळे मानसिक हिंसाचार होतो. एखाद्याकडून चूक झाली तरी त्याला माफ करून मन शांत ठेवावे.
 
11. स्त्रियांशी संबंध करणे  : एकादशीला स्त्रियांशी  सम्बन्ध स्थापित  करणे देखील निषिद्ध आहे, कारण यामुळेही मनात विकृती निर्माण होते आणि भगवंताच्या भक्तीकडे लक्ष लागत नाही. त्यामुळे एकादशीला स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवू नयेत.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit