शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 5 डिसेंबर 2020 (15:17 IST)

देवदत्त आणि अनंत विजय शंखाची महत्ता जाणून घ्या

या शंखाला समुद्रज, कंबु, सुनाद, पावनध्वनी, कंबोज, अब्ज, त्रिरेख, जलज अर्णोभव, महानाद, मुखर, दीर्घनाद, बहुनाद, हरिप्रिय, सुरचर, जलोद्भ, विष्णुप्रिय, धवल, स्त्रीविभूषण, पाञ्चजन्य, अर्णवभव या नावाने ओळखतात. हे निरोगी शरीरासह संपत्ती देखील देतात. हे दैवीय असण्यासह मायावी देखील असतात. शंखांचा हिंदू धर्मात एक उच्च आणि पवित्र स्थान आहे. घरात आणि देऊळात किती आणि कोणते शंख ठेवावे या संदर्भात शास्त्रात उल्लेख मिळतो. शिवलिंग आणि शाळीग्राम प्रमाणेच शंखाचे देखील बरेच प्रकार आहे. सर्व प्रकारच्या शंखांचे महत्त्व आणि कार्य वेग-वेगळे असतात. समुद्र मंथनाच्या वेळी देव-दानव संघर्षात समुद्रातून 14 मौल्यवान रत्नं मिळाले. ज्यामध्ये आठवे रत्न शंख होते. चला तर मग देवदत्त आणि अनंत विजय शंखाचे फायदे जाणून घेऊ या.
 
1 देवदत्त शंख - 
* हा शंख महाभारतात अर्जुन जवळ होता. वरुण देवांनी त्यांना हे भेट म्हणून दिले होते.
* ह्याचा वापर दुर्देवीनाशक मानतात.
* असे म्हणतात की या शंखाचा वापर न्यायाच्या क्षेत्रात विजय मिळवून देतो. न्यायालयीन क्षेत्रातील लोक ह्याची पूजा करून फायदा मिळवून घेतात.
* हे शंख शक्तीचे प्रतीक मानले आहे.
 
 
2 अनंत विजय शंख -
* युधिष्ठिराच्या शंखाचे नाव अनंतविजय होते.
* अनंतविजय म्हणजे अंतहीन विजय.
* या शंखामुळे प्रत्येक कामात विजय मिळते. प्रत्येक क्षेत्रात विजय मिळविण्यासाठी अनंत विजय नावाचे शंख मिळणे दुर्मिळ आहे.