Aarti of Lord Vishnu गरुवारी शुभ फल प्राप्तीसाठी करा भगवान विष्णूची ही आरती
Aarti of Lord Vishnu गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. भगवान विष्णूंना श्री हरी असेही म्हणतात. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा विधि व सुव्यवस्था राखून करावी. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी भगवान विष्णूची आरती करावी. भगवंताची उपासना केल्याने शुभ फल प्राप्त होते. विष्णूची आरती-
आवडी गंगाजळे देवा न्हाणीलें । भक्तीचें भूषण प्रेमे सुगंध अर्पिले ।।१।।
अहं हा धूप जाळूं श्रीहरीपुढे । जंव जंव धूप जळे तंव तंव देवा आवडे ।।२।।
रमावल्लभदासे अहं ।। धूप जाळीला । एकारतीचा मग प्रारंभ केला ।।३।।
सोहं हा दीप ओवाळू गोविंदा । समाधी लागली पाहतां मुखारविंदा ।।१।।
हरिख हरिक होता मुख पाहतां । चाकाटल्या ह्या नारी सर्वही अवस्था ।।२।।
सद्भवालागी बहु हा देव भुकेला । रमावल्लभ दासे अहं नैवेद्य अर्पिला ।।३।।
फळे तांबूल दक्षणा अर्पिली । तया उपरी निरांजने मांडिली ।।१।।
आरती करुं गोपा । मी तूं पण सांडोनि वेळोवेळा ।
पंचप्राण पंचज्योती आरती उजळली । दृश्य हे लोपले । तया प्रकाशांतळी ।।२।।
आरती प्रकाशे चंद्र सूर्य लोपले । सुरवर सकळीक तटस्थ ठेले ।।३।।
देवभक्त पण न दिसे कांही । ऐशापरी दास रमावल्लभ पायीं ।। आरती०।।४।।