शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Ganapati Atharvashirsha With Meaning गणपती अथर्वशीर्ष अर्थासह

ganesha idol
गणपती अथर्वशीर्ष सिद्ध असून याचे दररोज पठण जीवनातील अडथळे दूर करते.
 
श्लोक 1
ॐ नमस्ते गणपतये ।
त्वमेव प्रत्यक्षन् तत्त्वमसि ।
त्वमेव केवलङ् कर्ताऽसि ।
त्वमेव केवलन् धर्ताऽसि ।
त्वमेव केवलम् हर्ताऽसि ।
त्वमेव सर्वङ् खल्विदम् ब्रह्मासि ।
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ।।
 
अर्थात:- हे ! गणेशा तुम्हाला नमस्कार असो, तुम्हीच जिवंत स्वरूप आहात, तुम्हीच कृती आणि कर्ता आहात, तुम्हीच संहारक आहात. तुमच्यामध्ये सर्व विश्व व्यापले आहे, 
 
तुम्ही पवित्र साक्षी आहात.
 
श्लोक 2.
ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।।
 
अर्थात :- ज्ञान म्हणतो, सत्य सांगतो.
 
श्लोक 3
अव त्वम् माम् । अव वक्तारम् ।
अव श्रोतारम् । अव दातारम् ।
अव धातारम् । अवानूचानमव शिष्यम् ।
अव पश्चात्तात् । अव पुरस्तात् ।
अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् ।
अव चोध्र्वात्तात् । अवाधरात्तात् ।
सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात् ।।
 
अर्थात :- तुम्ही माझे आहात, माझे रक्षण करा, माझ्या आवाजाचे रक्षण करा. जे माझे ऐकतात त्यांचे रक्षण करा जो मला देतो त्याचे रक्षण करा, जो मला धारण करतो 
 
त्याचे रक्षण करा. वेद, उपनिषदे आणि त्याचे वाचक यांचे रक्षण करा, तसेच त्यांच्याकडून ज्ञान घेणार्‍या शिष्यांचे रक्षण करा. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या चारही 
 
दिशांनी संपूर्ण संरक्षण द्या.
 
श्लोक 4
त्वं वाङ्मयस्त्वञ् चिन्मयः ।
त्वम् आनन्दमयस्त्वम् ब्रह्ममयः ।
त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि ।
त्वम् प्रत्यक्षम् ब्रह्मासि ।
त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ।।
 
अर्थात:- तुम्हीच वाम आहात, तुम्हीच चिन्मय आहात, तुम्हीच आनंद ब्रह्म ज्ञानी आहात, तुम्हीच सच्चिदानंद आहात, अद्वितीय रूप आहात, तुम्हीच प्रकट कर्ता आहात, 
 
तुम्हीच ब्रह्म आहात, तुम्हीच ज्ञानविज्ञानाचा दाता आहात.
 
श्लोक 5
सर्वञ् जगदिदन् त्वत्तो जायते ।
सर्वञ् जगदिदन् त्वत्तस्तिष्ठति ।
सर्वञ् जगदिदन् त्वयि लयमेष्यति ।
सर्वञ् जगदिदन् त्वयि प्रत्येति ।
त्वम् भूमिरापोऽनलोऽनिलो नभः ।
त्वञ् चत्वारि वाव्पदानि ||
 
अर्थात :- तुम्ही या जगाचे निर्माता आहात, सर्व जगाला तुम्ही संरक्षण दिले आहेस, सर्व जग तुमच्यामध्ये आहे, सर्व जग तुमच्यामध्ये दिसते आहे, तुम्ही जल, जमीन, 
 
आकाश आणि वायू आहात, तुम्हीच चारही दिशेला व्यापलेला आहात.
 
श्लोक 6
त्वङ् गुणत्रयातीतः ।
(त्वम् अवस्थात्रयातीतः ।)
त्वन् देहत्रयातीतः । त्वङ् कालत्रयातीतः ।
त्वम् मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ।
त्वं शक्तित्रयात्मकः ।
त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् ।
त्वम् ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वम् रुद्रस्त्वम्
इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वञ चन्द्रमास्त्वम्
ब्रह्मभूर्भुवः स्वरोम्
 
अर्थात :- प्रभू तुम्ही सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांपेक्षा वेगळे आहात. तुम्ही तीन वेळा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान याहून भिन्न आहात. तिन्ही देहांपासून 
 
वेगळे आहात, तुम्ही जीवनाच्या मूळ पायावर वसलेले आहात. तुमच्यामध्ये धर्म, उत्साह आणि मानसिक या तीन शक्ती व्याप्त आहेत. योगी आणि महागुरू फक्त तुमचेच 
 
ध्यान करतात. तुम्ही ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नि, वायू, सूर्य, चंद्र आहात. तुमच्यात सगुण, सगुण आणि निर्गुण यांचा समावेश आहेस.
 
श्लोक 7 .
गणादिम् पूर्वमुच्चार्य
वर्णादिन् तदनन्तरम् ।
अनुस्वारः परतरः । अर्धेन्दुलसितम् ।
तारेण ऋद्धम् । एतत्तव मनुस्वरूपम् ।
गकारः पूर्वरूपम् । अकारो मध्यमरूपम् ।
अनुस्वारश्चान्त्यरूपम् ।
बिन्दुरुत्तररूपम् ।
नादः सन्धानम् । संहिता सन्धिः ।
सैषा गणेशविद्या । गणक ऋषिः ।
निचृद्गायत्री छन्दः । गणपतिर्देवता ।
ॐ गँ गणपतये नमः ।।
 
अर्थात :- “गण” याचे उच्चारण केल्यानंतर आदिवर्ण अकार उच्चारण करा | ॐ कार उच्चारण करा | हे पूर्ण मन्त्र ॐ गं गणपतये नम: चा मनोभावे उच्चारण करा.
 
श्लोक 8
एकदन्ताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नो दन्तिः प्रचोदयात्
 
अर्थात :- एकदंत, वक्रतुंड याचे आम्ही ध्यान करतो. आम्हाला या सद्मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या.
 
श्लोक 9
एकदन्तञ् चतुर्हस्तम्,
पाशमङ्कुशधारिणम् ।
रदञ् च वरदम् हस्तैर्बिभ्राणम्,
मूषकध्वजम् ।
रक्तं लम्बोदरं,
शूर्पकर्णकम् रक्तवाससम् ।
रक्तगन्धानुलिप्ताङ्गम्,
रक्तपुष्पैःसुपूजितम् ।
भक्तानुकम्पिनन् देवञ्,
जगत्कारणमच्युतम् ।
आविर्भूतञ् च सृष्ट्यादौ,
प्रकृतेः पुरुषात्परम् ।
एवन् ध्यायति यो नित्यं
स योगी योगिनां वरः ||
 
अर्थात :-  भगवान गणेश एकदंत चार भुजाधारी आहे ज्यात पाश, अंकुश, दंत आणि वर मुद्रा आहेत. त्यांच्या ध्वजावर एक मूषक आहे. हे लाल वस्त्रधारी आहे. चंदनाचे लेप 
 
लावलेले आहे. लाल फुले धारण करतात सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे जगात सर्वत्र व्यापत आहेत. सृष्टी रचियता आहे. त्यांची मनापासून पूजा करणारा महान योगी आहे.
 
श्लोक 10
नमो व्रातपतये, नमो गणपतये,
नमः प्रमथपतये,
नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय,
विघ्ननाशिने शिवसुताय,
वरदमूर्तये नमः ||
 
अर्थात :– व्रातपति, गणपतीला नमन. प्रथम पतीला नमन, एकदंताला नमन, विध्नविनाशक, लम्बोदर, शिवतनय श्री वरद मूर्तीला नमन.
 
श्लोक 11
एतदथर्वशीर्षं योऽधीते ।
स ब्रह्मभूयाय कल्पते ।
स सर्वविघ्नैर्न बाध्यते ।
स सर्वतः सुखमेधते ।
स पञ्चमहापापात् प्रमुच्यते ।
सायमधीयानो दिवसकृतम्
पापन् नाशयति ।
प्रातरधीयानो रात्रिकृतम्
पापन् नाशयति ।
सायम् प्रातः प्रयुञ्जानोऽअपापो भवति ।
सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति ।
धर्मार्थकाममोक्षञ् च विन्दति ।
इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयम् ।
यो यदि मोहाद्दास्यति
स पापीयान् भवति ।
सहस्रावर्तनात् ।
यं यङ् काममधीते
तन् तमनेन साधयेत् ।।
 
अर्थात :-  जो या अथर्वशीषाचा पाठ करतो तो विघ्नांपासून दूर होतो. तो नेहमी आनंदी राहतो, पाच महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळचे पठण केल्याने दिवसाचे 
दोष दूर 
 
केले जातात. सकाळी पाठ केल्याने रात्रीचे दोष दूर होतात. निरंतर पाठ करणारा दोषमुक्त होतो आणि धर्म, अर्थ, काम व मोक्षावर विजय प्राप्त करतो. याचे 1000 वेळा 
 
पठण केल्याने उपासक सिद्धी प्राप्त करून योगी बनतो.
 
श्लोक 12
अनेन गणपतिमभिषिञ्चति ।
स वाग्मी भवति ।
चतुथ्र्यामनश्नन् जपति
स विद्यावान् भवति ।
इत्यथर्वणवाक्यम् ।
ब्रह्माद्यावरणम् विद्यात् ।
न बिभेति कदाचनेति ।।
 
अर्थात :- जो कोणी या मंत्राच्या जपाने गणेशाला अभिषेक करतो, त्याची वाणी त्याची दास बनते. जो चतुर्थीचा उपवास करतो आणि जप करतो तो विद्वान होतो. जो 
 
विश्वाचे आवरण जाणतो तो भयमुक्त असतो.
 
श्लोक 13
यो दूर्वाङ्कुरैर्यजति ।
स वैश्रवणोपमो भवति ।
यो लाजैर्यजति, स यशोवान् भवति ।
स मेधावान् भवति ।
यो मोदकसहस्रेण यजति ।
स वाञ्छितफलमवाप्नोति ।
यः साज्यसमिद्भिर्यजति
स सर्वं लभते, स सर्वं लभते ।।
 
अर्थात :-  जो दुर्वाकुरोने पूजन करतो तो कुबेरासारखा होतो, जो लाजा यासह पूजा करतो तो यशस्वी होतो, गुणवंत होतो, मोदकांसह पूजा करणार्‍याला मनाप्रमाणे फळ 
 
मिळते. जो घृतक समिधाने हवन करतो त्याला सर्व काही मिळते. 
 
श्लोक 14
अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा,
सूर्यवर्चस्वी भवति ।
सूर्यग्रहे महानद्याम् प्रतिमासन्निधौ
वा जप्त्वा, सिद्धमन्त्रो भवति ।
महाविघ्नात् प्रमुच्यते ।
महादोषात् प्रमुच्यते ।
महापापात् प्रमुच्यते ।
स सर्वविद् भवति, स सर्वविद् भवति ।
य एवम् वेद ।।
 
अर्थात :- जे आठ ब्राह्मणांना उपनिषदांचे ज्ञानी करतात ते सूर्यासारखे तेजस्वी आहेत. सूर्यग्रहणाच्या वेळी, नदीच्या काठावर किंवा आपल्या इष्टसमीप 
उपनिषदांचे पठण केले तर सिद्धी मिळते. ज्याने जीवनातील अडथळे दूर होतात, पापे कापली जातात, तो विद्वान होतो, ही अशी ब्रह्म विद्या आहे.
 
शान्तिमन्त्र
ॐ भद्रङ् कर्णेभिः शृणुयाम देवाः ।
भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः
व्यशेम देवहितं यदायुः ।।
 
अर्थात :- हे ! गणपति आमच्या कानात असे शब्द पडावे ज्यामुळे आम्हाला ज्ञान मिळावे आणि निंदा व दुराचारापासून दूर राहावे. आम्ही सदैव समाजसेवेत मग्न राहो, वाईट कर्मांपासून सदैव दूर राहो. 
 
भगवंताच्या भक्तीत तल्लीन असो. आमच्या आरोग्यावर सदैव आपली कृपा असो, आम्हाला भोगापासून दूर राहू द्या. आपल्या शरीरात, मनामध्ये आणि धनात भगवंत वास करो जो आपल्याला सदैव आशीर्वाद देतो, अशी प्रार्थना आहे.
 
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः ।
स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्ति नस्ताक्ष्र्योऽअरिष्टनेमिः
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ।।
 
अर्थात : ज्याची कीर्ती चारही दिशांना पसरलेली आहे, ज्याची देव इंद्र, जो देवांचा देव आहे, ज्याच्यासारखी कीर्ती आहे, जो ज्ञानाचा अगाध सागर आहे, ज्याच्यामध्ये बृहस्पतीसमान शक्ती आहेत. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कृतीला दिशा दिली जाते, ज्यामुळे संपूर्ण मानवजातीचा फायदा होतो.