सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Garbh Raksha Mantra नऊ महिने गर्भाचे रक्षण करणारा गणपतीचा प्रभावी मंत्र

Dohale Jevan Songs Marathi
Garbh Raksha Mantra या मंत्राचा जप केल्याने चांगुलकी, शांती आणि कल्याणाची भावना जागृत होते. आपण त्या कारणांवर ध्यान केंद्रित करु शकता जे आपल्या जीवना समस्याचे कारण आहे. विशेष करुन गर्भावस्था दरम्यान या मंत्राचा जप प्रभावी सिद्ध होतो.
 
या मंत्राचा जप केल्याने निरोगी संतान संसार येते.
या मंत्राचा जप दररोज किमान एक माळ अर्थात 108 वेळा केला पाहिजे.
प्रसवची वेळ जवळ आल्यावर माळाची संख्या वाढवता येऊ शकते ज्याने प्रसवात त्रास कमी होतो.
 
हिन्दू शास्त्रांमध्ये मनुष्याच्या प्रत्येक समस्यावर उपचार आहे. मग समस्या धनसंबंधी असो किंवा आरोग्यसंबंधी, प्रत्येक समस्येचा निराकरण करण्यासाठी शास्त्रात कोणता न कोणता उपाय आहे ज्याने फलित सिद्ध होतं.
 
मनुष्य धनाला खूप महत्त्व देतं परंत जेव्हा आरोग्यावर गोष्ट येते तेव्हा धनापेक्षा आरोग्याचं किती महत्त्व आहे हे समजतं. व्यक्तीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. पारंपारिक उपाय किंवा मंत्रांच्या मदतीने एखादी व्यक्ती स्वतःला निरोगी बनवू शकते.

पण आज आम्ही तुम्हाला एका मंत्राबद्दल सांगत आहोत जो गर्भवती महिलेसाठी फायदेशीर आहे. हा मंत्र गर्भवती महिलेचे तसेच तिच्या न जन्मलेल्या बाळाचे रक्षण करतो.
 
जर एखादी स्त्री गरोदर असेल, जरी ती गर्भधारणेच्या पहिल्या किंवा मध्यम अवस्थेत असली तरीही हा मंत्र तिचे रक्षण करण्यास सक्षम आहे. या मंत्राच्या जपाने जन्मलेले मूल निरोगी जगात येते.
 
या मंत्रासाठी गरोदर महिलेने भगवान शंकराची बाळ गणेशाची मूर्ती आणावी लागते. या मूर्ती किंवा चित्रासमोर बसून मंत्राचा जप करावा लागतो.
 
मंत्राचा जप केल्यानंतर किमान दोन मोदक गणेशाला अर्पण करावे लागतात. गरोदर महिलेने हे लक्षात ठेवावे की हा मोदक स्वतःच्या हातांनी बनवला आहे आणि तो फक्त तिलाच स्वीकारावा लागेल. हा मोदकाचा प्रसाद कुटुंबातील इतर सदस्यांना देऊ नये.
 
मंत्र - 
रक्ष रक्ष गणाध्यक्ष: रक्ष त्रैलोक्य नायक:, भक्त नाभयं कर्ता त्राताभव भवार्णवात्
 
या मंत्राचा दररोज किमान एक जपमाळ म्हणजेच 108 वेळा जप करावा लागतो. शक्य असल्यास आपण यापेक्षा अधिक करू शकता. जेव्हा प्रसूतीची वेळ जवळ येते तेव्हा जपमाळांची संख्या वाढवता येते. जर स्त्रीने गर्भधारणेपासून नऊ महिने या मंत्राचा जप केला तर तिचे भावी मूल निरोगी राहतं आणि ती स्वतःही निरोगी राहते.