मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (12:22 IST)

गणपती पूजनाचे 5 विशेष दिवस

पार्वती पुत्र गजाननाच्या भक्तांना गाणपत्य संप्रदायाचे मानले गेले आहे जे की गूढ हिंदू संप्रदायाचे सदस्य आहे. हा संप्रदाय महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात प्रचलनात होता. गणपतीच्या मूर्तीची पूजा जगभरातील प्राचीन सभ्यतेत प्रचलित होती. तसं तर प्रत्येक शुभ कार्यात आधी गणपतीची पूजा करण्याची परंपरा आहे म्हणून जाणून घ्या गणेश पूजनाचे 5 विशेष दिवस- 
 
चतुर्थीला करा पूजा : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. या प्रकारे 24 चतुर्थी आणि प्रत्येक तीन वर्षांने अधिमास जोडून 26 चतुर्थी येतात. सर्व चतुर्थीची महिमा आणि महत्व वेगवेगळे आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याचे विशेष महत्त्व आहे.
 
बुधवारी करा पूजा : बुधवार हा दिवस गणपतीचा मानला गेला आहे. या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा आणि आराधना केली पाहिजे.
 
विशेष चतुर्थी पूजा :
1. विनायक चतुर्थी : चतुर्थीचे देव आहे शिवपुत्र गणेश. या तिथीला गणपती पूजन केल्याने सर्व विघ्न नाहीसे होतात. भाद्र महिन्याच्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे, ज्याला विनायक चतुर्थी म्हणतात. अनेक जागी ही 'वरद विनायक चतुर्थी' आणि 'गणेश चतुर्थी' नावाने साजरी केली जाते. या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुख-सौभाग्य लाभतं.
 
2. संकष्टी चतुर्थी : माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणार्‍या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी, माघी चतुर्थी किंवा तीळ चतुर्थी म्हणतात. बार महिन्याच्या अनुक्रमात ही चतुर्थी सर्वात मोठी मानली जाते. चतुर्थी व्रत पालन केल्याने संकटापासून मुक्ती मिळेत आणि आर्थिक लाभ प्राप्ती होते.
 
3. अनंत चतुर्दशी : अनंत चतुर्दशी भाद्रपद शुक्ल पक्षात येते. डोल ग्यारस नंतर अनंत चतुर्दशी आणि त्यानंतर पौर्णिमा. या दहा दिवसीय गणेशोत्सवानंतर गणेश प्रतिमेचं विजर्सन होतं. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवसापर्यंत गणेश पूजन केलं जातं.
 
4. दिवाळीच्या दिवशी : दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी पूजा दरम्यान गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे.
 
5. बुधवारची चतुर्थी : ही खला तिथी आहे. तिथी 'रिक्ता संज्ञक' ओळखली जाते. म्हणून या दिवशी शुभ कार्य वर्जित असतात. चतुर्थी गुरुवारी असल्यास मृत्युदा असते आणि शनिवारची चतुर्थी सिद्धिदा असते आणि चतुर्थीच्या 'रिक्ता' होण्याचा दोष त्या विशेष स्थितीत संपतं. चतुर्थी तिथीची दिशा नैऋत्य आहे.