1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

रामरक्षा स्तोत्र कां म्हणावे...

ram raksha benefits
राम राम चा उच्चार केल्यावर शरीरात होणारे बदल, शास्त्रीय द्रुष्टीने सांगितले आहेत. मला समज नव्हती तेव्हा पासून माझे दोन्ही आजोबा, काका, मामा एकमेकाना रामराम घालायचे...
 
रामराम खूपदा हा शब्द ऐकला होता पण अर्थ समजला नव्हता. एके दिवशी रामरक्षा स्तोत्र का म्हणावे. बिकट स्थिती असताना आवर्जून का म्हणावे या बाबत अर्थ समजला रामरक्षा स्तोत्र म्हणतात इतक्या वेळेस राम शब्द का येतो...?
 
१) 'र' अक्षाराचा उच्चार करताना आपल्या नाभी म्हणजे बेंबी जवळील भाग आतमध्ये ओढला जातो. तो आत जातो तेव्हा आपले मणिपूर चक्र कार्यान्वित होते. हे चक्र नाभिस्थाना जवळ असते. ह्याला दहा पाकळ्या असून सत्वगुणात्मक सृष्टीचे पालन करणारा विष्णु याची अधिष्ठात्री देवता आहे.
 
२) शरीराचा मध्य बिंदू अर्थात गुरुत्वमध्य ह्याच चक्रात असतो. 
 
३) ह्या चक्रावर धारणा केल्याने चित्तात सत्वगुण वाढून ते स्थिर होऊ लागते.
 
४) धारणा म्हणजे काय? चित्ताची स्थिरता म्हणजे धारणा किंवा एकाग्रता.
 
५) चित्त शरीरांतील एखाद्या भागावर स्थिर ठेवण्याचा अभ्यास करणे म्हणजे धारणेचा अभ्यास करणे होय.
 
६) महत्त्वाचं--- एकदा आपल्याला आपल्या चक्रांचं शरीरातील स्थान माहीत झाले की त्या स्थानावर धारणा केली (त्या स्थानावर आपलं चित्त एकाग्र केलं) की त्या चक्रावर ती धारणा केली असं म्हणतात.
 
७) ज्या नाडीचक्रावर आपण चित्त स्थिर केलं (धारणा केली) की त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे व्यापार सुसूत्रपणे चालू लागतात.
 
उदाहरणार्थ आपल्या शरीरातील खालील अवयव/ग्रंथी मणिपूर चक्राच्या नियंत्रणाखाली असतात 
 
-Liver 
-Pancreas
-Small Intestine
-Kidney
- Adrenal Gland
-Gall bladder
 
मणिपूर चक्र बिघडलं की हे रोग होऊ शकतात
-Indigestion
-Diabetes
-Acidity
-Ulcer
-Cholitis
-Appendicitis
-Kidney Stone
-Nephropathy.
 
वर उल्लेख केला आहे Adrenal Glands चा. या glands खूप महत्त्वाचे हॉर्मोन्स निर्माण करतात त्यांचं नाव आहे- adrenaline आणि  cortisol...  
 
Adrenaline ची level बिघडलं की खालील परिणाम होतात- 
High BP
High Sugar
Depression
 
एखादी वाईट बातमी आली की आपले हृदयाचे ठोके वाढतात, बीपी वाढतं, भीति वाटते, excitement वाढते, anxiety वाढते... 
 
ते कशामुळे ????? 
तर त्यावेळी आपल्या Adrenal Glands खूप उत्तेजित होतात म्हणून. यालाच आपण म्हणतो पोटात खड्डा पडला किंवा छातीत धस्सं झालं. हा आघात आपल्या मणिपूर चक्रावर होतो हृदयावर नाही पण त्याचे परिणाम हृदयावर होतात. 
 
मग ते pressure release करायला लगेचच आपल्या systems activate होतात. काही लोकांना लगेच urine pass होतं, काही लोकांना तर लगेच शौचास जावे लागते... असे होते म्हणजे समजावं की आपल्या systems व्यवस्थित काम करत आहेत. अश्या परिस्थितीत बरेच जूने लोकं रामरक्षा म्हणायला सुरुवात करतात...
 
खरं ना ?????
रामरक्षाच कां?
 
मणिपूर चक्राचं बीज अक्षर आहे र. र चा वारंवार उच्चार केल्याने आपलं मणिपूरचक्र आहत होतं आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व इंद्रिये / ग्रंथी उत्तेजीत होतात... सोप्या भाषेत सांगायचे तर charge होतात व त्यातून निघणारा स्त्राव नियंत्रित होतो... 
 
परंतु नुसतं एकसारखे रं म्हणत राहिलो की कंटाळायला होईल. आपल्या बुधकौशिक ऋषींना याचं पक्क ज्ञान होतं म्हणून त्यांनी रामरक्षा स्तोत्राची रचना केली.
 
रामरक्षेत किती वेळा र अक्षर येतं ? ते मोजून पहा. त्याची आवर्तनं केलीत तर किती वेळा र चा उच्चार होईल याची कल्पना करा ! मग किती वेळा आपलं मणिपूरचक्र आहत होईल याचा विचार करा. कुठल्याही चक्राला activate करायचं असेल तर त्याच्यावर धारणा करायची असते. 
 
आपण रामरक्षा म्हणताना डोळे मिटून मणिपूर चक्रावर आपलं चित्त एकाग्र केलं तर निश्र्चितच आपलं चक्र activate होईल आणि सतत 'र' अक्षराच्या उच्चाराने निर्माण होणारी energy, त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे शुद्धीकरण व बळकटीकरण करेल... परिणामी त्याला संलग्न असलेले आजार पण मिटतील.
 
म्हणून जुनी लोकं म्हणजे आपलेच पूर्वज कुणी वारल्यानंतर त्याचे अंत्यविधीला नेताना राम बोलो भाई राम म्हणायचे... का तर मनावरचा दबाव हलका व्हावा. आपले आणि समोरच्याचे आरोग्य राखण्यासाठी पुन्हा पुन्हा राम राम, र र... राम राम या अक्षरांच्या उच्चाराने एकमेकांना रामराम घालायचे. आपण सुद्धा राखू शकतो. 
 
त्या दिवसापासून मी देखील माझे सासऱ्यानाच काय तर फोनवर किंवा इतर सर्वत्र भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 'राम राम' घालायला लागलो. आज माझे दोन्ही आजोबा नाहीत, सासरे या जगात नाहीत पण त्यांनी वाटलेल्या राम नामाच्या या शिदोरीचे महत्त्व कळायला वयाचे ४२ वे वर्ष उगवायला लागले.
 
मात्र जब जागो तब सवेरा म्हणत आपल्या ड्रिमसिटीचे सर्व गार्डला येता जाता राम राम म्हणायला सुरुवात केली. आता ते सुध्दा मागील दिढ वर्षापासून प्रत्येकाला राम राम म्हणतात. 
 
अगोदर गु मॉर्निंग, गुड एव्हीनिंग, हॅलो, हाय सारखी निरर्थक ग्रिटींग्ज देणे बंद करायला, जीभ वळायला महिना गेला. हळूहळू इतके अंगवळणी झाले की आता तोंडातून आपोआप राम राम येतो आणि समोरच्याच्या मुखातून सुद्धा राम राम हाच उच्चार ऐकायला मिळतो.
 
लहान भावंडे, स्थानिक आणि परदेशातील मित्र देखील आपल्याशी बोलताना रामराम घालून बोलायला लागले याची अनुभूती आणि अनुभव अविस्मरणीय आहे. 
रामराम...

-सोशल मीडिया