शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (11:25 IST)

26 नोव्हेंबर रोजी मोठी अमावस्या, पितरांसाठी करा हे 5 काम, मिळेल आशीर्वाद

अमावास्येला पितृ दोष निवारणासाठी पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. परंतू अमावास्येला नेमके काय करायचे हे माहीत नसेल तर ही माहिती खास आपल्यासाठी योग्य ठरेल. जाणून घ्या या दिवशी करण्यासारखे अचूक आणि योग्य उपाय.
 
या प्रकारे करा पितृ दोष शांती :-
* अमावास्येला आपल्या पितरांची आठवण करत पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी, गंगाजल, काळे तीळ, साखर, तांदूळ, पाणी आणि फुलं अर्पित करावे.
* 'ॐ पितृभ्य: नम:' मंत्राचा जप करावा.
* पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचा पाठ करणे शुभ फल प्रदान करणारे ठरेल.
* प्रत्येक संक्रांती, अमावस्या आणि रविवारी सूर्य देवाला तांब्याच्या भांड्यात लाल चंदन, गंगा जल आणि शुद्ध जल मिसळून 'ॐ पितृभ्य: नम:' या बीज मंत्राचा उच्चार करत 3 वेळा अर्घ्य द्यावं.
* अमावास्येला दक्षिणाभिमुख होऊन दिवंगत पितरांसाठी पितृ तरपण करावे.