गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

सर्व पितृ मोक्ष अमावस्या: या उपायांनी पितृ दोष दूर होईल

ज्योतिष्यामध्ये पितृदोष सर्वात मोठा दोष मानला गेला आहे. याने पीडित व्यक्तीचे जीवन अत्यंत कष्टात जातं. ज्या जातकाच्या कुंडलीत हा दोष असतो त्याला धन अभाव आणि मानसिक कष्ट झेलावं लागतं. पितृदोष पीडित जातकाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. पितृदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व पितृ मोक्ष अमावास्येचे सोपे उपाय:
 
* पितृ अमावास्येला घराच्या दक्षिण भीतींवर आपल्या स्वर्गीय नातेवाईकांचा फोटो लावून त्यांच्यावर हार अर्पित करून पूजा स्तुती करावी. त्यांच्याकडून आशीर्वाद घेतल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.
 
* गरजू लोकांना आणि गुणी ब्राह्मणांना भोजन करवावे. आहारात मृतात्म्याच्या आवडीचे पदार्थ असल्यास उत्तम. किमान एक पदार्थ तरी त्यांच्या पसंतीचा असावा.
 
* या दिवशी सकाळी स्नान करून नागड्या पायाने महादेवाच्या मंदिरात जाऊन आकड्याचे 21 फुलं, कच्ची लस्सी, बेलपत्र यासह महादेवाची पूजा करावी. याने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो.
 
* पितृ अमावास्येला गरीब कन्येचा विवाह किंवा आजारासाठी मदत केल्याने लाभ प्राप्ती होते.
 
* पितृ अमावास्येला ब्राह्मणांना प्रतिकात्मक गोदान, पाण्यासाठी विहिरी खोदणे किंवा रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍यांसाठी प्याऊ उघडल्याने पितृदोषापासून सुटका मिळतो.
 
* पितृ अमावास्येला पवित्र पिंपळाचं किंवा वडाचं झाडं लावावं. प्रभू विष्णूंचे मंत्र जपा, श्रीमद्भागवत गीता पाठ केल्याने पितरांना शांती मिळते आणि दोष कमी होतो.
 
* पितृ अमावास्येला पितरांच्या नावावर गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे आणि दिवंगत नातलगांच्या नावावर रुग्णालय, मंदिर, विद्यालय, धर्मशाळा इतर सामाजिक कार्यासाठी हातभार लावल्याने लाभ प्राप्ती होते.
 
* या दिवशी शक्य असल्यास आपल्या सामर्थ्यानुसार गरिबांना वस्त्र आणि अन्न धान्य दान केल्याने दोष नाहीसे होतात.
 
* सर्व पितृ अमावास्येला पिंपळाच्या झाडाला दुपारी पाणी, पुष्प, अक्षता, दूध, गंगाजल, काळे तीळ अर्पित करावे आणि स्वर्गीय पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्याकडून आशीर्वादाची प्रार्थना करावी.
 
* सर्व पितृ अमावास्येला संध्याकाळी दिवा लावावा आणि नाग स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्र सूक्त किंवा पितृ स्तोत्र व नवग्रह स्तोत्राचा पाठ करावा. याने पितृ दोष शांती होते.