5 ची संख्या म्हणून आहे एवढी शुभ, बघा पंचामृत ते पंचमेवा पर्यंतचे महत्त्व
पंचदेव : सूर्य, गणेश, शिव, शक्ती आणि विष्णू हे पंचदेव म्हणून ओळखले जातात. सूर्याची दोन परिक्रमा, गणपतीची एक परिक्रमा, शक्तीची तीन, विष्णूची चार तथा शिवाची अर्धी परिक्रमा केली जाते.
पाच उपचार पूजा : गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पित करणे म्हणजे पंच उपचार पूजा असते.
पंच पल्लव : पिंपळ, गूलर, अशोक, आंबा आणि वटाचे पान सामूहिक रूपेण पंच पल्लवच्या नावाने ओळखले जातात.
पंच पुष्प : चमेली, आंबा, शमी (खेजडा), पद्म (कमळ) आणि केनेरचे फूल सामूहिक रूपेण पंच पुष्पच्या नावाने ओळखले जातात.
पंचामृत : दूध, दही, तूप, साखर, मधाचे मिश्रण पंचामृताच्या नावाने ओळखले जाते.
पंचांग : ज्या पुस्तकात किंवा तालिकेत तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग हे संमिलित रूपेण दर्शवले जातात त्याला पंचांग म्हणतात.
पंचमेवा : काजू, बदाम, किशमिश, छुआरा, खोबर्याचा डोल हे पंचमेव्याच्या नावाने ओळखले जातात.