गायत्री यंत्रम
प्रत्येक यंत्रामागे त्या-त्या देवतेचे प्रतीक असते. यंत्रावर त्या देवतेची बीजाक्षरे कोरलेली असतात. त्या बीजाक्षरांची पूजा या यंत्र पूजेमुळे होते व साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात.
गायत्री मंत्राच्या प्रत्येक अक्षरांमध्ये प्रचंड सामर्थ्य भरलेले आहे. त्यामुळेच त्या मंत्रा इतका साधा व उपयुक्त दुसरा मंत्र नाही. या यंत्रामुळे ऐहिक जीवनातील प्रत्येक गोष्ट साध्य होते. आत्मिक बळ प्राप्त होते. शारीरिक रोग नष्ट होतात. मनोव्यथा दूर होते. पातकापासून मुक्तता होते. आर्थिक मान वाढते.
गायत्री यंत्र जाड तांब्यावर उठवलेले पूजेत ठेवावे. रोज स्नानानंतर गायत्री मंत्राचा जप किमान 10 अगर 108 वेळा करावा. यंत्राची एकाग्रतेने पूजा करावी. क्षणभर स्थिर चित्ताने या यंत्राकडे पाहावे व चिंतन करावे.
गय म्हणजे प्राण. ह्या प्राणाचे रक्षण करते म्हणून तिला गायत्री हे नाव पडले आहे. या यंत्र पूजेच्यावेळी मंत्रानंतर गायत्री देवीची प्रार्थना करावी. हे गायत्री देवी आम्ही आपली उपासना करतो. आमचे रक्षण कर.