श्री यंत्र जसे की नावांवरूनच कळतयं की हे धनप्रदायिनी देवी श्री महालक्ष्मीचे यंत्र आहे. ज्या घरात श्रीयंत्र स्थापित केले जाते तेथे देवी लक्ष्मी निवास करते. एक आख्यायिकेनुसार एकदा देवी लक्ष्मी रुसून वैकुंठात निघून जाते. त्यांची सर्वत्र शोधाशोध होते. त्यामुळे सर्वत्र गदारोळ उडतो. त्या वेळी त्यांना प्रसन्न करण्यासाठी देवगुरु बृहस्पतींने या श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा करण्यास सांगितले. त्यामुळे देवी लक्ष्मीस पृथ्वीलोक येण्यास भाग पाडले.
अती प्राचीन काळापासून हिंदूंना श्री यंत्राची उपासना माहित होती. हे यंत्र प्राचीन हिंदुराजे आपल्या देव पूजेत नित्यनियमाने ठेवत. आज ही कोट्यधीशाच्या देवपूजेत हे यंत्र असते. संसारी माणसांनी या यंत्रेची दररोज उपासना केल्यास त्याला सांसारिक सुख तर मिळतंच त्याची अध्यात्मिक प्रगती देखील होते.
यंत्र म्हणजे काय
यंत्र एक विशेष प्रकाराची भौमितिक आकृती असते. विशेष मंत्र किंवा विशेष शक्तीचे रूप म्हणजेच यंत्र होय. यंत्रामध्ये आकार, रेखा आणि ठिपक्यांचा प्रयोग केला जातो. यंत्रात कोणतीही रेखा, आकार, आणि ठिपके चुकीचे बनल्याने यंत्राचे अर्थ बदलू शकते. यंत्राचे 2 प्रकार आहे. एक रेखा आणि आकाराचे आणि दुसरे अंकांचे. अंकांच्या यंत्रापेक्षा आकाराचे यंत्र जास्त चांगली फळश्रुती देणारे असतात.
श्री यंत्राची महत्ता
धनागमनासाठी आणि सर्व वैभव मिळविण्यासाठी तसेच देवी लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावर नेहमीच असावा या साठी काही तोडगे आहे.
* श्री यंत्र धनाचे प्रतीक असते.
* श्री यंत्र शक्ती आणि सिद्धीचे द्योतक आहे.
* श्री यंत्राची स्थापना केल्याने घरात संपन्नता, समृद्धी आणि एकाग्रता येते.
* दारिद्र्याचा नायनाट होतो.
* श्रीयंत्र सपाट, उठावदार आणि पिरॅमिड आकाराचे असू शकतात.
* प्रत्येक यंत्राचा आगळा-वेगळा प्रभाव असून ते लाभदायी असतात.
यंत्राच्या वापर करण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी. जाणून घेऊ या त्या गोष्टी.
* यंत्र उर्ध्वमुखी आणि अधोमुखी असतात.
* स्थापनेपूर्वी बघून घ्यावे कि यंत्र व्यवस्थित आहे की नाही.
* श्रीयंत्र स्थापनेत पावित्र्य ठेवावे, नियमित मंत्रजाप करावे.
* यंत्र आपणास देवघरात, कार्यस्थळी, अभ्यासाचा खोलीत देखील ठेवता येते.
एकाग्रतेसाठी श्रीयंत्र कशे वापरावे
* ऊर्ध्वमुखी यंत्राची तसबीर कार्यस्थळी किंवा अभ्यासाच्या खोलीत लावावी.
* नेहमी श्रीयंत्राचे रंगीत चित्रच लावावे.
* श्री यंत्र नेहमी दृष्टीक्षेप असावे.
* श्री यंत्राचे पावित्र्य राखावे.
धनप्राप्तीसाठी श्रीयंत्र
वेग वेगळ्या उद्देष्टाच्यापूर्ती साठी श्रीयंत्राचा वापर केला जातो. आयुष्यभरासाठी धन आणि वैभव मिळविण्यासाठी या यंत्राला अश्या प्रकारे स्थापित करावे.
* स्फटिक पिरॅमिड यंत्राची पुजेस्थळी स्थापना करावी.
* हे नेहमी स्वच्छ गुलाबी कापडावर ठेवावे.
* दररोज या यंत्राला स्नान घालून फुले वाहावी.
* साजूक तुपाचा दिवा लावून श्री यंत्रचा मंत्राचे जप करणे.
* दररोज श्री यंत्र पूजा करणाऱ्यांनी श्री यंत्राला इतर देवाप्रमाणे तांबडे फुल वाहून त्याला लाल पिंजर वहाव्या आणि उदबत्ती लावून पुढील श्लोक म्हणावे आणि मंत्र जप करावे.
त्रेलोक्य पूजिते देवी कमले विष्णुवल्लभे ।
यथा त्वं सुस्थिरा कृष्णे तथा भव मयि स्थिरा ।
ईश्वरी कमला लक्ष्मीश्चला भूमिर्हरी प्रिया ।
पद्मा पद्मालया संपद रामा श्री पद्मधारिणी ।
द्वादशैतानी नामानि लक्ष्मी संपूज्य य: पठेत ।
स्थिरा लक्ष्मीर्भवेत पुत्र दारादिभि :सहै ।।
मंत्र - श्रीं ह्रीं क्लीं एं सौ: ऊं ह्रीं श्रीं क ए इ ल ह्रीं ह स क ह ल ह्रीं स क ल ह्रीं सौ: एं क्लीं ह्रीं श्रीं.