गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 15 जानेवारी 2020 (16:56 IST)

देव पूजा दररोज या प्रकारे करणे फलदायी

आपल्या घरातील देव-पूजा आपण करतोच तरी शास्त्रोक्त पूजा कशी करायची हे जाणून घेऊ या.
 
पूजा करणे याबाबत एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे पूजा करून टाकली, पूजा उरकून टाकली, असं कधीही म्हणू नये. कारण पूजेत काहीच टाकायचे नसतं. तर घ्यायचं असतं.

पूजा सुरु करण्यापूर्वी पूर्वीचं निर्माल्य काढून घ्यावं. 
देवाची पूजा करण्यापूर्वी देव्हार्यातील समई किंवा तेलाचा दिवा लावावा.
देव ताम्हणात घेऊन त्यांना पाणी- पंचामृत- शुद्ध पाणी घालून स्नान घालावे.
देव धुवून पुसून जागेवर ठेवावे. 
त्यांना गंध, फुल, अक्षदा वाहाव्यात. 
मग धूप, दीप, निरांजन लावावे. 
देवाला नैवेद्य दाखवावा.
मग आरती मंत्रपुष्पांजली म्हणावी. 
प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा.
प्रार्थना करावी. 
स्नानानंतर घरातील मुलांनी देवासमोर बसून बुद्धिदात्या श्री गणेश आणि विद्यादात्री देवी सरस्वतीची प्रार्थना करावी. 
 
दररोज ही प्रार्थना करावी-
 
गणपती साठी 
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ !
निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा !!
गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पतीं !
पंचेतांनी स्मरे नित्यं वेदवाणी प्रवृतये !!
 
सरस्वतीसाठी 
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता !
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।!
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता ! 
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा !!
ह्याच बरोबर दररोज प्रज्ञावर्धन स्रोत म्हणावे. ज्याने मुलांची बुद्धी तल्लख होते. स्मरणशक्तीत वाढ होते 

तसेच गजानन मंत्र म्हणून किमान 5 तरी दुर्वा हळदी कुंकू लावून गणपतीला अर्पण कराव्या आणि म्हणावे- 
 
ॐ गं गणपतये नमः !
 ॐ एकदंताय विध्म्हे वक्रतुंडाय धीमहि 
तन्नो दंती : प्रचोदयात !