रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

कामदा एकादशी: व्रत केले नाही तरी या प्रकारे करू शकता देवाला प्रसन्न

कामदा एकादशी विष्णूंना प्रसन्न करण्याची तिथी आहे तरी या दिवशी कृष्णाची उपासना करून देखील सांसारिक दोषा आणि पापांपासून मुक्ती मिळू शकते. तसं तर एकादशी व्रत पूर्ण विधी विधानाने करावे. याने सर्व पाप नाहीसे होतात. तर जाणून घ्या का महत्त्वाची आहे एकादशी तिथी.
 
कामदा एकादशी महत्त्व
* शरीर आणि मनाला संतुलित ठेवण्यासाठी व्रत आणि उपासाचे नियम बनवले गेले आहे.
* सर्व प्रकाराच्या व्रतांमध्ये सर्वाधिक महत्त्व हे एकादशी व्रताचे आहे.
* एकादशी महिन्यातून दोनदा येते. एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात
* एकादशी मुख्य रूपाने प्रभू विष्णू आणि त्यांचे अवतार यांची पूजा करण्यासाठी योग्य तिथी मानली गेली आहे.
* चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे.
* याने मन शरीर संतुलित राहतं आणि आजारांपासून रक्षा होते.
* पाप, नाश आणि मनोकामना पूर्तीसाठी कामदा एकादशीचे विशेष महत्त्व आहे.
 
कोणत्याही कारणास्तव आपण व्रत करण्यात अक्षम असाल तर हे उपाय अमलात आणू शकता:
* अंघोळ झाल्यावर विष्णू किंवा कृष्णाची पूजा करावी.
* दिवसभर सात्त्विक राहावे. मन पवित्र ठेवावे.
* या दिवशी अन्न किंवा गरिष्ठ आहार घेणे टाळावे.
* अधिक वेळ ईश्वर उपासनेत घालावा.
 
या दिवशी प्रभू विष्णूंसह कृष्णाची आराधना केल्याचे विधान आहे. या दिवशी कृष्णाची उपासना करून सर्व पापांपासून मुक्ती मिळू शकते. तर जाणून घ्या कशा प्रकारी करावी कृष्ण उपासना:
* या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यावे. मग कृष्णाची आराधना करावी.
* कृष्णाला पिवळे फुलं, फळ, पंचामृत आणि तुळस अर्पित करावी.
* नंतर प्रार्थना करावी आणि कृष्ण मंत्राची माळ जपावी.
* दिवसभर हलका आहार, जलीय आहार किंवा फळाहार घ्यावा तर उपास न करता देखील उत्तम परिणाम हाती लागतील.
* एक वेळ उपास ठेवत असणार्‍यांनी दुसर्‍या वेळी वैष्णव भोजन करावे.
* दुसर्‍या दिवशी एखाद्या निर्धन व्यक्तीला अन्न दान करावे.
* हा दिवस ईश्वर भक्ती घालवावा. क्रोध करू नये. खोटं बोलू नये. कोणाला टोचून बोलू नये.
 
या व्यतिरिक्त काही महापापांपासून मुक्ती हवी असल्यास हे सोपे उपाय देखील करता येतील.
* देवाला म्हणजे कृष्णाला चंदनाची माळ ‍अर्पित करावी.
* नंतर 'क्लीं कृष्ण क्लीं' या मंत्राच्या 11 माळ जपाव्या.
* अर्पित केलेली चंदन माळ नंतर स्वत:जवळ ठेवावी.
* याने प्रसिद्धी आणि यश मिळेल.
 
या व्रताने संतान सुख देखील मिळतं
* यासाठी दंपतीने संयुक्त रूपाने कृष्णाला पिवळं फुल आणि पिवळे फळ अर्पित करावे.
* सोबत संतान गोपाल मंत्राच्या किमान 11 माळ जपाव्या.
* नंतर संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करावी.
* फळ दंपतीने प्रसाद म्हणून ग्रहण करावे.