मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

का दाखवतात मोदकाचा नैवेद्य?

असे मानले आहे की गणतीला मोदक खूप प्रिय आहे म्हणूनच भक्त गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवतात. पण या परंपरेचे विशेष महत्त्व आहे.
 
'मोद' म्हणजे आनंद आणि 'क' म्हणजे लहान-सा भाग. अर्थातच मोदक म्हणजे आनंदाचा लहान भाग. मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे 'ख' नामक ब्रह्मरंध्र याच्या आवरणाप्रमाणे असतो. आणि कुंडलिनी चे 'ख' पर्यंत पोहचण्याने आनंदाची अनुभूती होते.


 
हातात ठेवलेल्या मोदकाचा अर्थ आहे की त्या हातात आनंद प्राप्त करण्याची शक्ती आहे. 
 
मोदक मानाचा प्रतीक आहे म्हणूनच त्याला ज्ञानमोदक असे ही म्हणतात.
 
सुरुवातीला वाटतं की ज्ञान थोडेच आहे (मोदकाचा वरचा भाग याचा प्रतीक आहे), पण अभ्यास केल्यानंतर समजतं की ज्ञान प्रचंड आहे. (मोदकाचा खालील भाग याचा प्रतीक आहे) अर्थातच ज्ञानामुळे प्राप्त झालेलं आनंदही मोदकासारखं गोड असतं.