सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (09:53 IST)

कार्तिक महिन्याला मोक्षाचे दार म्हटलं आहे, याचे महत्त्व जाणून घ्या

हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला खूप महत्त्व दिले आहेत. हा महिना श्री हरी विष्णू आणि देवी आई लक्ष्मीला समर्पित आहे. या महिन्यात पूजा आणि उपवास केल्याने सर्व कष्ट दूर होतात. कार्तिक महिन्यात ब्रह्म मुहूर्तावर स्नान केल्याने पृथ्वीवरील सर्व तीर्थ केल्याचे पुण्य प्राप्त होतात. जाणून घ्या की या महिन्याला मोक्षाचे दार का म्हणतात आणि याचा महत्त्व काय आहे? 
 
कार्तिक हा सणाचा महिना आहेत आपल्याकडे कार्तिक महिन्यापूर्वी बरेच मोठे सण येतात जसे नरक चतुर्दशी, वसु वारस, कार्तिकात पाडवा, भाऊ वीज देव उठणी एकादशी सण साजरे केले जाते. या देव उठणी एकादशी नंतर लग्न सराय, गृह प्रवेश इत्यादी कार्ये सुरू होतात. 
 
कार्तिक महिन्याचे नाव कसे पडले - 
हिंदू पंचांगात वर्षाचे 12 महिने असतात. प्रत्येक महिन्याचे वेगवेगळे नवे आहेत. असे म्हणतात की या महिन्यात भगवान शिवाच्या मुलाने कुमार कार्तिकेयाने तारकासुर नावाच्या राक्षसाचे अंत केले असे. म्हणून या महिन्याचे नाव कार्तिकेय झाले. कार्तिकेयाच्या विजय होण्या बद्दल देखील या महिन्याला कार्तिकेय म्हणतात.
 
कार्तिक महिन्याचे महत्त्व -
कार्तिक महिना हा तपश्चर्या आणि व्रताचा महिना आहे. या महिन्यात देवाची भक्ती आणि पूजा उपासना केल्याने माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हा महिना भगवान विष्णूंचा आहे. या महिन्याला मोक्षाचे दार देखील म्हणतात. कारण या महिन्यात विष्णूची उपासना आणि पूजा नियमाने आणि भक्तिभावाने केल्याने माणसाला मोक्षाची प्राप्ती होते.

या महिन्याचा महानतेबद्दल नारद पुराणात आणि पद्मपुराणात उल्लेख मिळतात. हा महिना माणसाला अध्यात्माकडे घेऊन जाणारे आहे. या महिन्यात भगवान विष्णूंची उपासना केल्याने सर्व प्रकारच्या कौटुंबिक आनंद मिळतो.