मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: रविवार, 22 जानेवारी 2023 (11:19 IST)

Magh Gupt Navratri 2023: माघ गुप्त नवरात्री, महत्त्व आणि पूजा जाणून घ्या

शक्ती साधनेचा सर्वात महत्वाचा सण, सनातन धर्मातील सर्वात पवित्र सण मानला गेला आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये एकूण चार नवरात्रींचे वर्णन आहे. चैत्र आणि शारदीय नवरात्रीशिवाय दोन गुप्त नवरात्रीही आहेत. एक गुप्त नवरात्र माघ महिन्यात आणि दुसरी आषाढ महिन्यात येते. 2023 मध्ये माघ महिन्यात पहिली गुप्त नवरात्री येणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार गुप्त नवरात्रीत दहा महाविद्यांची पूजा केली जाते.

चैत्र महिन्याचे नवरात्र मोठे नवरात्र म्हटले जातो आणि अश्विन महिन्याचे नवरात्र लहान किंवा शारदीय नवरात्र  म्हणतात आषाढ आणि माघ मासात गुप्त नवरात्र येतात. हे गुप्त नवरात्र तांत्रिक साधनांसाठी असतात. आणि साधारण किंवा सामान्य नवरात्र शक्तीच्या साधनेसाठी असतात.गुप्त नवरात्रीमध्ये माँ अंबेच्या नऊ रूपांची पूजा केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते. असे मानले जाते. 
 
गुप्त नवरात्रीची सुरुवात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते, जी नवमीपर्यंत चालते. यावर्षी माघ गुप्त नवरात्रीची सुरुवात 22 जानेवारी 2023 पासून होणार आहे. तर ती 30 जानेवारी 2023रोजी संपेल. या दरम्यान माँ दुर्गा उपासक 9 दिवस गुप्त मार्गाने शक्ती साधना करतात.
 
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 22 जानेवारी 2023 रोजी 02.22 मिनिटांनी सुरू होईल. प्रतिपदा तिथी 22 जानेवारीला रात्री 10.27 वाजता संपते. असे असताना घटस्थापना 22 जानेवारीलाच केली जाईल.
घटस्थापना मुहूर्त -   सकाळी 10:04 ते सकाळी 10:51
घटस्थापना अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:17 ते दुपारी 01:00
मीन राशीचा प्रारंभ - 22 जानेवारी 2023, सकाळी 10:04
 
गुप्त नवरात्रीच्या तिथी -
प्रतिपदा तिथी - घटस्थापना आणि देवी शैलपुत्री पूजा
 द्वितीया तिथी- देवी  ब्रह्मचारिणी पूजा
तिसरी तिथी - देवी चंद्रघंटा पूजा
चतुर्थी तिथी - देवीकुष्मांडा पूजा
पंचमी तिथी - देवी स्कंदमाता पूजा 
षष्ठी तिथी - देवी कात्यायनी पूजा 
सप्तमी तिथी - देवी कालरात्रीची पूजा 
अष्टमी तिथी- देवी महागौरीची पूजा 
नवमी तिथी - देवी  सिद्धिदात्रीची पूजा
 दशमीची तिथी -नवरात्रीचे पारण
 
पूजा विधी -
माघ महिन्यात येणाऱ्या गुप्त नवरात्रीच्या नऊ दिवसांना विशेष महत्त्व आहे. या दरम्यान सकाळी स्नान करून नियमानुसार माँ दुर्गेची पूजा करावी. धनवृद्धीसाठी माँ लक्ष्मीच्या प्रतिमेवर कमळाचे फूल अर्पण करावे. यासोबतच रोजच्या पूजेदरम्यान माँ दुर्गाला शृंगारचे  साहित्य अर्पण करावे. असे केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. आयुष्यात कशाचीही कमतरता होणार नाही . 

Edited by - Priya Dixit