शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (15:21 IST)

10 असे चमत्कारिक मंत्र, जे आपल्या सर्व संकटाचा नायनाट करतील

'मंत्र' म्हणजे मनाला एकाद्या व्यवस्थेत बांधणे. जर अनावश्यक आणि अत्याधिक विचार उद्भवत असल्यास आणि ज्यामुळे काळजी निर्माण होत असल्यास, तर मंत्र सर्वात प्रभावी औषध असते. आपण आपल्या ज्या इष्ट किंवा आराध्य देवी किंवा देवांची उपासना करत असाल तर त्यांचे नाममंत्राचे जप करू शकता.
 
मंत्र 3 प्रकाराचे आहे- सात्विक, तांत्रिक आणि साबर. सर्व मंत्राचे वेगवेगळे महत्व आहे. दररोज जाप केले जाणारे मंत्र सात्विक मंत्र म्हटले जाते. चला जाणून घेऊ या असे कोणते मंत्र आहे ज्यापैकी एका मंत्राचे दररोज जप केले पाहिजे, ज्यामुळे मनाची शक्तीच वाढत नाही, तर सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते.
 
या मंत्रांच्या जपच्या वेळी पावित्र्यता ठेवावी. जसे घरात असल्यास देवघरात बसून, कार्यालयात असल्यास पायातून पादत्राणे काढून या मंत्रांचा आणि देवाचे स्मरण करावे. या मुळे आपणास मानसिक बळ मिळतो, जे आपल्या उर्जेला वाढविण्यास सिद्ध होतील.
 
क्लेशनाशक मंत्र : कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम:
मंत्र प्रभाव : या मंत्राचा सतत जाप केल्याने कलह आणि संकटाचा अंत होऊन घरात सौख्य नांदते. 
 
शांतिदायक मंत्र : श्री राम, जय राम, जय जय राम.
मंत्र प्रभाव : मारुती देखील रामाच्या नावाचे जप करतात. असे म्हणतात की रामापेक्षा श्रीरामाचे नाव अधिक आहे. या मंत्राचा सात्यताने जाप केल्याने मनात  शांतता पसरते, चिंतांपासून सुटका मिळते. मेंदू शांत राहत. राम नावाच्या जापला सर्वोत्तम मानले गेले आहे. हे सर्व प्रकारच्या नकारात्मक विचारांना दूर करतं आणि हृदयाच्या अंत:करणाला स्वच्छ करून भक्ती भावाचे संप्रेषण करते. 
 
चिंता मुक्ती मंत्र : ॐ नम: शिवाय.
मंत्र प्रभाव : या मंत्राचा सातत्याने जाप केल्याने चिंतामुक्त आयुष्य मिळतं. हा मंत्र जीवनात शांतता आणि शीतलता देते. शिवलिंगावर पाणी आणि बेलाचे पान अर्पण करताना हा शिवमंत्र म्हणावा आणि रुद्राक्षच्या माळेने जप करावा. तीन शब्दांचा हा मंत्र महामंत्र आहे.
 
संकटमोचन मंत्र : ॐ हं हनुमते नम:
मंत्र प्रभाव : हृदयात कोणत्याही प्रकाराची काळजी, भीती किंवा शंका असल्यास दररोज सातत्याने या मंत्राचा जाप करावा आणि निश्चित राहा. कोणत्याही कार्याला यशस्वी आणि जिंकण्यासाठी या मंत्राचे सातत्याने जप करावे. हा मंत्र आत्मविश्वास वाढवतो. 
 
मारुतीला शेंदूर, गूळ-चणे अर्पण करून या मंत्राचे सततचे स्मरण किंवा जप साफल्य आणि यश देणारे आहेत. जर मारकेश त्रास होत असल्यास या मंत्राचा त्वरित जप करावा. 
 
शांती, सुख आणि समृद्धीसाठी : भगवान विष्णूंचे अनेक मंत्र आहेत, परंतु येथे काही प्रामुख्याने सादर आहे.
1.  ॐ नमो नारायण किंवा श्रीमन नारायण नारायण हरि-हरि.

2. ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर. भूरि घेदिन्द्र दित्ससि.
ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्. आ नो भजस्व राधसि.

3. ॐ नारायणाय विद्महे.
वासुदेवाय धीमहि. 
तन्नो विष्णु प्रचोदयात्.

4. त्वमेव माता च पिता त्वमेव.
 त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव.
 त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव. 
त्वमेव सर्व मम देवदेव.
 
 
5. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्. 
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्.
 लक्ष्मीकान्तंकमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्.
 वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्.
 
मंत्र प्रभाव : भगवान विष्णूंना जगत्पालक मानले जाते. तेच आपल्या सर्वाना सांभाळणारे आहेत म्हणून पिवळे फुल आणि पिवळे कापड अर्पण करून या पैकी कोणत्याही एका मंत्राने त्यांचे स्मरण केल्याने, जीवनात सकारात्मक विचार आणि घटनांचा विकास होऊन जीवन अधिक सुखी होईल. श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी ची उपासना आणि पूजा केल्याने सौख्य आणि समृद्धी वाढते.
 
मृत्यूवर विजय मिळविण्यासाठी महामृत्युंजय मंत्र:
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंपुष्टिवर्द्धनम्
उर्वारुकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्
 
मंत्राचे प्रभाव : शिवाचे महामृत्युन्जय मंत्र मृत्यू आणि काळाला टाळणारे मानले गेले आहे. म्हणूनच शिवलिंगावर दूध मिश्रित पाणी, धोत्रा अर्पण करून हा मंत्र दररोज म्हणणे संकट हरणारे आहेत. जर आपल्या घरातील एखादा सदस्य रुग्णालयात दाखल असल्यास किंवा खूप आजारी असल्यास नियमाने या मंत्राचा आधार घ्यावा. या मध्ये अट अशी आहे की जो या मंत्राचे जप करणार आहे किंवा करीत आहे त्याला मन आणि कर्माने पावित्र्य असले पाहिजे अन्यथा हा मंत्र आपले प्रभाव दाखवत नाही.
 
 
सिद्धि आणि मोक्षदायी गायत्री मंत्र : 
ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्
 
अर्थ: त्या प्राणस्वरूप, दुःख नाशक, सुख स्वरूपी, श्रेष्ठ, तेजस्वी, पापाचे नाश करणारे देवस्वरूप परमात्मा ला अंतःकरणापासून धारण करावं. तो परमात्मा आमच्या बुद्धीला सन्मार्गाकडे जाण्यासाठी प्रेरणा देवो.
 
मंत्र प्रभाव : हा जगातील एकमेव मंत्र आहे, जो देवासाठी, देवाच्या साक्षीने, आणि देवाच्या प्रति आहे. हा मंत्र मंत्राचा मंत्र, हिंदुशास्त्रांत पहिले मंत्र आणि महामंत्र म्हटले आहे. प्रत्येक समस्येसाठी हा एक प्रभावी मंत्र आहे. या साठीची एकमात्र अट अशी आहे की या मंत्राचे जप करण्याऱ्याला शुद्ध आणि पावित्र्य असले पाहिजे. अन्यथा हा मंत्र आपले प्रभाव दाखवत नाही.
 
समृद्धिदायक मंत्र : ॐ गं गणपते नम:
मंत्र प्रभाव : भगवान गणेशाला विघ्नहर्ता मानले गेले आहे. सर्व मांगलिक कार्याची सुरुवात श्री गणेशायनमः मंत्राच्या जपाने करतात. या दोन्ही मंत्राचा गणेशाला दुर्वा आणि चिमूटभर शेंदूर आणि तूप अर्पण करून किमान 108 वेळा जप करावं. या मुळे आयुष्यात सर्वप्रकारचे शुभ आणि लाभाची सुरुवात होते.
 
अचानक आलेल्या संकटापासून मुक्तीसाठी कालिकाचे हे अचूक मंत्र आहे. देवी आई या मंत्राला पटकन ऐकते, पण या साठी आपल्याला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. निव्वळ प्रयत्न करून बघण्यासाठी या मंत्राचा वापर करू नये. आपण कालीचे भक्त असाल तरच या मंत्राचे जाप करावे.
1 : ॐ कालिके नम:।
 
2 : ॐ ह्रीं श्रीं क्रीं परमेश्वरि कालिके स्वाहा
मंत्र प्रभाव : या मंत्राचा दररोज 108 वेळा जाप केल्याने आर्थिक फायदा मिळतो. पैशाशी निगडित सर्व समस्यां दूर होतात. आई कालीच्या कृपेने सर्व काम होतात. 15 दिवसातून एकदा कोणत्याही मंगळवार किंवा शुक्रवार च्या दिवशी आई कालीला विड्याचे गोड पान आणि मिठाई नैवेद्यात द्यावी.
 
दरिद्रतानाशक मंत्र : ॐ ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नम.
मंत्र प्रभाव : या मंत्राची 11 माळ सकाळी शुद्ध भावनेने दिवा लावून आणि धूप देऊन जाप केल्याने धन, सुख, शांती मिळते. विशेषतः धनाचे अभावाला दूर करण्यासाठी या मंत्राचा जाप करावे.