शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

सोमवारी करा महादेवाच्या या मंत्रांचा जप

संसारिक आयुष्यात महादेवाचे स्वरूप आणि चरित्र संतुलन आणि ताळमेळाची आदर्श प्रेरणा आहे. महादेव सृष्टीचे रचनाकार ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू या सर्व देवांचे प्रिय आणि पूजनीय आहेत. महादेवाचे संहारक रूप जगाचे रचनाकार आणि पालनकर्ते यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाचा नाश करून जगामध्ये संतुलन कायम ठेवतात. 

याच कारणामुळे व्यवहारिक आयुष्यात सर्व दु:ख, कलह, दरिद्रता हे दोष दूर करण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी महादेवाच्या छोट्या-छोट्या मंत्रांचा जप करावा. या मंत्रांमुळे महादेवाच्या वेगवेगळ्या रूपातील गोष्टी उजागर होतील. सोमवारी महादेवाच्या खाली दिलेल्या १२ मंत्रांचा जप केल्याने मोठे-मोठे कार्य यशस्वी होतील.

सोमवारी शिवलिंगावर दुध आणि पाण्याचा अभिषेक करा. गंध, अक्षदा, नैवैद्य दाखवून महादेवाची पूजा करा. पूजा करतांना किंवा झाल्यानंतर दिवा लाऊन आसनावर बसा आणि खाली दिलेल्या मंत्राचा जप करा. सर्वात शेवटी महादेवाची आरती करा.

ॐ महादेवाय नम:, ॐ हरये नम:, ॐ हराय नम:

ॐ महेश्वराय नम:, ॐ शंङ्कराय नम:, ॐ अम्बिकानाथाय नम:

ॐ गंगाधराय नम:, ॐ जटाधराय नम:, ॐ त्रिमूर्तये नम:

ॐ सदाशिवाय नम:, ॐ मृत्युञ्जयाय नम:, ॐ रुद्राय नम: