मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 7 डिसेंबर 2024 (08:41 IST)

मार्तंडभैरवाष्टक

मार्तंडभैरवाष्टक
नमो चंड मार्तंड तो खड्गधारी ॥१॥
उभा जेजुरीला असे सौख्यकारी ॥२॥
करीं शूल शोभे तुझी थोर सत्ता ॥३॥
नमो भैरवा शंकरा विश्वनाथा ॥४॥
अगा म्हाळसेच्या वरा देवराया ॥५॥
असावी शिरीं ती कृपाछत्र छाया ॥६॥
तुझ्यावीण आतां नसे कोण त्राता ॥७॥
नमो भैरवा शंकरा विश्वनाथा ॥८॥

ध्यान श्लोक
ध्यायेन्मल्लरिदेवं कनकगिरिनिभं म्हाळसाभूषिताड्कम्‍ ।
श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधबुध गणै: सेव्युमानं कृतार्थै ॥
व्यक्तंकध्रिं दैत्यमूर्घि डमरुविलसितं नैशचूर्णार्शभिरामम्‍ ।
नित्य भक्तेषु तुष्टं श्वगणपरिवृतं नित्यमोंकाररुपम्‍ ॥
 
॥ नमो मार्तंड ॥
जेजुरी असे राजधानी तयाची ।
म्हाळसा राणी पट्टराणी मार्तंडाची
देव माझा थोर मल्हारी मार्तंडराजा
सदा वंदितो तो खड्गधारी खंडोबा
॥ येळकोट येळकोट जय मल्हार ॥