बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 मे 2021 (08:48 IST)

Parshuram Jayanti 2021 : परशुराम जयंती शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा विधी

हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला परशुराम जयंती साजरी केली जाते. यंदा 14 मे रोजी परशुराम जयंती आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुराम जयंती साजरी केली जाते. भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार आहे. या दिवशी भाविक व्रत करतात आणि ब्राह्मणांद्वारे विशेष पूजा अर्चना केली जाते. जाणून घ्या परशुराम जयंतीचं महत्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी.
 
परशुराम जयंती शुभ मुहूर्त
वैशाख शुक्ल पक्ष तृतीया तिथी – 14 मे 2021 शुक्रवारी सकाळी 5.40 वाजता
वैशाख शुक्ल पक्ष तृतीया तिथी समाप्ती – 15 मे 2021 शनिवारी सकाळी 08 वाजता
 
परशुराम जयंती महत्व
पौराणिक कथांप्रमाणे भगवान परशुराम भगवान विष्णूंचे सहावे अवतार होते. यांचा जन्म ब्राह्मण आणि ऋषिंवर होणारे अत्याचार मिटविण्यासाठी झाला होता. भगवान परशुरामांचा जन्म त्रेता युगात ऋषि जमदग्नि आणि आई रेणुका यांच्यात घरी झाला. असे मानले जाते की परशुराम जयंतीला व्रत आणि आराधना केल्याने संतान प्राप्ती होते. या दिवशी पूजा केल्याचे पुण्य कधीही क्षय होत नाही. 
 
परशुराम जयंती पूजा विधी
तृतीया तिथीला सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करणे शुभ मानले गेले आहे. जर हे शक्य नसेल तर घरातच अंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचं पाणी मिसळून स्नान करु शकता.
यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. 
धूप- दीप लावून संकल्प घ्यावा.
परशुराम भगवान विष्णूंचे अवतार आहे म्हणून विष्णूंना चंदन, तुळशीचे पानं, कुंकु, उदबत्ती, फुलं आणि मिठाई अर्पित करुन विधीपूर्वक पूजा करावी.
शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.
या दिवशी उपवास करत असणार्‍यांनी अन्न सेवन करु नये.