सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 8 मे 2023 (15:21 IST)

या देशात नास्तिक होत आहे लोकं ? 50% महिलांचा देवावरचा विश्वास कमी होत आहे

buddha temple japan
social media
Japanमध्ये धार्मिक लोकांच्या तुलनेत कोणत्याही धर्माला न मानणाऱ्या लोकांची संख्या अभूतपूर्व वेगाने वाढली आहे, त्यामुळे यामागे अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावले जात आहेत. यासाठी काही धार्मिक संघटनांशी संबंधित लोकांनी राजकीय जगतात घडलेल्या घटनांसोबत भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा ठपका ठेवला आहे.
 
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, एका विश्लेषकाचे असे मत आहे की, ओम शिनरिक्यो आणि युनिफिकेशन चर्च यांसारख्या 'नवीन धर्मां'मुळे निर्माण झालेल्या समस्या अजूनही जपानी समाजावर परिणाम करत आहेत. 2023 मध्ये टोकियोच्या त्सुकीजी मंदिरात केलेल्या सर्वेक्षणात, जेव्हा लोकांना विचारण्यात आले की त्यांच्या धर्मावरील विश्वासात काय बदल झाला आहे? या प्रश्नाला उत्तर देताना सुमारे 40 टक्के लोकांनी धर्मावरील श्रद्धा कमी झाल्याचे सांगितले.
 
महिलांचा कमी झालेला विश्वास!
या सर्वेक्षणात सहभागी 18 ते 50 वर्षे वयोगटातील महिला धर्माबाबत सर्वाधिक नकारात्मक दृष्टिकोन स्वीकारत आहेत. सुमारे 50 टक्के महिलांनी थेट सांगितले की त्यांचा विश्वास कमी झाला आहे, म्हणजेच त्यांचा धर्मावरील विश्वास नक्कीच कुठेतरी डगमगला आहे. त्याच वेळी, 35 टक्के पुरुषांनी असेही म्हटले की ते आता स्वत: ला धर्माशी जोडू शकत नाहीत. या मंदिराला भेट देणारे 60 वर्षांखालील पुरुष आणि स्त्रिया मानतात की त्यांच्याकडे बौद्ध मंदिरात जाण्याचे कोणतेही विशेष कारण नाही.
 
1990 च्या दशकातील
काही विश्लेषकांचा असा विश्वास आहे की 1990 च्या दशकात जपानी जनतेचा धार्मिक संघटनांवरील विश्वास उडाला जेव्हा पंथ ओम शिनरिक्यो अनेक गुन्हेगारी कटाचा केंद्रबिंदू बनला. 1995 मध्ये या संघटनेच्या सदस्यांनी टोकियोमधील 3 मेट्रो ट्रेनमधून विषारी वायू सोडला. ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता.

Edited by : Smita Joshi