शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (09:18 IST)

प्रदोष व्रत 2021: आज प्रदोष व्रत, जाणून घ्या भगवान शिव पूजेचा शुभ काळ, उपासना पद्धत, महत्त्व आणि विशेष योगायोग

प्रदोष व्रत उद्या म्हणजे 5 ऑगस्ट, दिवस गुरुवारी आहे. प्रदोष व्रत भगवान शंकरांना समर्पित आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची विधींनी पूजा केली जाते. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. प्रत्येक महिन्यात त्रयोदशी तिथी एकदा शुक्ल पक्षात आणि एकदा कृष्ण पक्षात येते. अशाप्रकारे, दरमहा दोन प्रदोष व्रत असतात आणि वर्षात एकूण 24 प्रदोष उपवास असतात.
 
प्रदोष शुभ वेळ आणि विशेष योगायोग-
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची त्रयोदशी 05 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 05:09 पासून सुरू होईल, जी 06 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06.28 वाजता संपेल. प्रदोष व्रताच्या दिवशी हर्षण योग तयार होत आहे. हर्षण योग 06 ऑगस्टच्या सकाळी 01:14 पर्यंत राहील. वैदिक ज्योतिषशास्त्रात, हर्षण योग हा सर्वात शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. हा योग शुभ वेळेत गणला जातो.
 
प्रदोष व्रत कथा : 
प्रदोषला प्रदोष म्हणण्यामागे एक कथा जुळलेली आहे. संक्षेपात हे चंद्राचे क्षय आजार होते, ज्यामुळे त्यांना मृत्युतुल्य कष्ट होत होतं. भगवान शिवाने त्या दोषाचे निवारण करुन त्यांना त्रयोदशीच्या दिवशी पुन:जीवन प्रदान केले होते म्हणून हा दिवस प्रदोष म्हणून ओळखला जाऊ लागला. तसं तर प्रत्येक प्रदोष व्रत कथा वेगवेगळी आहे. स्कंद पुराणात प्रदोष व्रताचे महात्म्याचे वर्णन सापडतं. हे व्रत केल्याने सर्व प्रकाराच्या इच्छा पूर्ण होतात. यात एक विधवा ब्राह्मणी आणि शांडिल्य ऋषींची कथा द्वारे व्रत महिमा वर्णन सापडतं.
 
पद्म पुराणाच्या एक कथेनुसार चंद्रदेव जेव्हा आपल्या 27 बायकांपैकी केवळ एक रोहिणीशी सर्वात जास्त प्रेम करत होते तेव्हा इतर 26 ला उपेक्षित ठेवायचे ज्यामुळे त्यांना श्राप मिळाला आणि त्यांना कुष्ठरोग झाला होता. अशात इतर देवतांच्या सल्ल्यावर त्यांनी महादेवाची आराधना केली आणि जेथे उपासना केली तेथे शिवलिंग स्थापिले. महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले आणि आजारापासून मुक्त केले. चन्द्रदेवाचे एक नाव सोम देखील आहे. त्यांनी भगवान शिवाला आपलं नाथ-स्वामी मानले आणि तप केले म्हणून हे स्थान 'सोमनाथ' झाले. 
 
प्रदोष व्रत : काय खावे काय नाही
 
1. प्रदोष काळात उपासात केवळ हिरवे मूग खाल्ले पाहिजे. हिरवे भूग पृथ्वी. तत्व आहे आणि मंदाग्निला शांत ठेवण्यास मदत करतं.
 
2. प्रदोष व्रतात लाल मिर्च, धान्य, तांदूळ आणि साधं मीठ खाणे टाळावे. आपण पूर्ण उपास किंवा फळाहार ही करु शकता.
 
प्रदोष व्रत विधी: व्रत असलेल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे. नित्यकर्म आटपून पांढर्याण रंगाचे वस्त्र धारण करावे. पूजा स्वच्छ आणि शुद्ध ठेवावे. गायीच्या शेणाने मंडप तयार करावे. मंडपाखाली 5 वेगवेगळे रंग वापरुन रांगोळी काढावी. नंतर उतर-पूर्व दिशेकडे मुख करुन बसावे आणि महादेवाची पूजा करावी. पूर्ण दिवस धान्याचे सेवन करु नये.