मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (17:27 IST)

दीप अमावस्या 2021 महत्व, माहिती आणि पूजा विधी

आषाढ महिन्याच्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणतात. श्रावण महिना सुरु व्हायच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते तर या दिवशी सर्व दिवे घासून स्वच्छ करुन त्यांची पूजा केली जाते. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. 
 
दीप अमावस्या : या दिवशी काय करावे
या दिवशी भगवान शिव, पार्वती, आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते.
या दिवशी महादेवाचे अनेक भक्त व्रत देखील ठेवतात.
अमावस्येला महिला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाच्या 108 प्रदक्षिणा करतात.
या दिवशी पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवल्याने पितर प्रसन्न होतात.
अमावस्येला पितृ तर्पण विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
या दिवशी झाडे लावून ग्रह दोष शांत होतो.
या दिवशी पीपल, केळी, केळी, लिंबू किंवा तुळशीच्या झाडाची लागवड करावी.
या दिवशी गंगा स्नान आणि देणगी देण्याचं देखील खूप महत्त्व आहे.
या दिवशी माशांना पीठाच्या गोळ्या खाऊ घालाव्या.
 
दीप अमावस्या पूजा विधी
या दिवशी दिवे, समया, निरांजने, लामण दिवे या सर्वांना घासून पुसून लख्ख करावे.
या दिवशी, सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडावे. 
पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी.
फुलांची आरास करावी.
सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावे. 
दिव्यांमध्ये वाती या कापसाच्या असाव्यात आणि शक्यतो जोड वात लावावी. 
ओल्या मातीचे दिवे देखील तयार करुन पूजेत मांडावे.
सर्वांची हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी.
कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवावे. त्यांचं नैवेद्य दाखवावं.
सायंकाळी सर्व दिवे उजळून आरती करावी. 
 
 
कहाणी करावी.
 
 
या दिवशी संध्याकाळी शुभंकरोती प्रार्थना म्हणून त्यानंतर मुलांना ओवाळावे. घरातील लहान मुले हे वंशाचे दिवे मानले जातात म्हणून त्यांचे औक्षण करावे.

यावेळी खालील दिलेल्या मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।
गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥
 
आपल्या संस्कृतीत दिव्याला अत्यंत महत्तव आहे. घरातील इडापिडा टाळावी तसंच अज्ञान, रोगराई दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरावा यासाठी दिप प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते.