गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जानेवारी 2019 (00:12 IST)

हे कायमचे लक्षात ठेऊया

1) लिंबू-मिरची खायची असतात - बांधण्यासाठी नसतात..
2) मांजर पाळायची असते - मांजर आडवी गेली कि काही वाईट होत नाही.उलट उंदरांपासून नुकसान होण्याचे टळते.
3) शिंक येणे हा नैसर्गिक प्रकार आहे - शिंकल्याने काही अघटीत होत नाही किंवा काही अडचणीही येत नाहीत..
4) भूत झाडावर राहत नाही - झाडावर पक्षी राहतात..
5) चमत्कार असे काही नसते - प्रत्तेक गोष्टी मागे विज्ञान आहे प्रत्येकाला कारण आहे..
6) बुवा, बाबा लोक खोटे आहेत - ज्या लोकांना अंग मेहनत करायची नसते तेच हे लोक..!!
7) करणी, जादू टोणा काही नसते - हे भ्याड लोकांच्या मनाचे खेळ आहेत.. 
जादू-टोणा करून ग्रहाची दिशा बदलणारे हे ढोंगी बाबा: वारा, ढगांची दिशा बदलून पाऊस का पाडत नाहीत...?
8)वास्तुशास्त्र भ्रामक आहे. केवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे.  खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा क्षणाला दिशा बदलत असते.  खरेच कुबेर उत्तर दिशेला असता तर जगातील इतर ठिकाणी कसा आला नाही.
9) नवसाने, व्रताने, पुजेने, नैवैद्याने, बळीने, देणगीने, प्रसन्न होऊन फळ देतो देव, म्हणजे तो काय लाचखाऊ आहे का ?!!
10) हे जे वाचलात ते स्वता अनुकरण करा.