1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (15:22 IST)

मांसाहार करताना किंवा स्मशानात जाताना रुद्राक्षाशी संबंधित विशेष नियम माहित असावे

Rudraksha Rules हिंदू धर्मग्रंथांमध्ये रुद्राक्ष हे महादेवाचे विशेष भाग असल्याचे मानले गेले आहे. असे मानले जाते की रुद्राक्षात एक विशेष प्रकारची ऊर्जा आढळते, जी ते परिधान करणाऱ्यांना विशेष शक्ती प्रदान करते. रुद्राक्षच्या वैशिष्ट्यांबद्दल तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ते धारण केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. याशिवाय रुद्राक्ष हे मन आणि मेंदूमध्ये आध्यात्मिक शक्ती प्रसारित करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. काही लोकांचा असाही विश्वास आहे की रुद्राक्ष धारण केल्याने भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद मिळतो.
 
रुद्राक्षाची वैशिष्ट्ये जाणून बहुतेक लोक त्याची माळ किंवा एक रुद्राक्ष गळ्यात, हातात किंवा बाजूमध्ये घालतात. तथापि बरेचदा असे दिसून येते की जे लोक मांस आणि मद्य सेवन करतात ते देखील रुद्राक्षाचे मणी घालतात. जे शास्त्राच्या नियमांच्या विरुद्ध आहे. अशात मांस, मासे आणि मद्य सेवन करणाऱ्यांनी रुद्राक्ष धारण करावा की नाही असा प्रश्न पडतो तर हे जाणून घेणे आवश्यक आहे की रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी?
 
मांसाहारी करणार्‍यांसाठी रुद्राक्षाशी संबंधित नियम
रुद्राक्ष धारण करण्याविषयी तज्ञ सांगतात की नॉनव्हेज खाणारे देखील पंचमुखी रुद्राक्ष धारण करु शकतात पण अशा लोकांनी यासंबंधीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जे मांसाहार करतात किंवा मद्यपान करतात त्यांनी हे करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की शरीराच्या कोणत्याही भागावर रुद्राक्षाच स्पर्श नसावा किंवा रुद्राक्ष धारण केलेले नसावे. कारण असे केल्याने रुद्राक्षाची शुद्धता भंग पावते आणि त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही मास-मदिराचे सेवन केले तर रुद्राक्षाशी संबंधित नियमांची विशेष काळजी घ्यावी.
 
शरीराच्या कोणत्या अंगांवर रुद्राक्ष धारण करता येतं
ज्योतिष शास्त्राप्रमाणे रुद्राक्ष गळ्यात, मनगट, आणि हृदयावर धारण करता येऊ शकतं. यातील सर्वात शुभ म्हणजे गळ्यात रुद्राक्ष धारण करणे. तज्ज्ञांच्या मते रुद्राक्षाचा अभिषेक केल्यानंतर स्नान आणि पूजा केल्यानंतरच रुद्राक्ष धारण करावा, कारण या पद्धतीने धारण केल्यानेच त्याची सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
 
झोपताना आणि स्मशानभूमीत रुदाक्ष धारण करू नये
धर्म शास्त्राप्रमाणे रुद्राक्ष धारण करणार्‍या जातकांनी झोपताना रुद्राक्षाची माळ काढून ठेवावी. तसं तर झोपताना रुद्राक्ष शरीरावर काढून उशाखाली ठेवता येतं. याने झोप चांगली येत आणि वाईट स्वप्ने येण्याची भीती देखील नसते. या व्यतिरिक्त रुद्राक्ष धारण करुन स्मशानभूमीत देखील जाणे टाळावे. अशाने कारण रुद्राक्षाचे पावित्र्य भंग होते.