शनिवार, 2 डिसेंबर 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (08:26 IST)

Vaman Jayanti 2023: शुभ फळाची प्राप्तीसाठी भगवान विष्णूच्या वामन स्वरूपाची पूजा करा, महत्तव, पूजा विधी जाणून घ्य

Vamana Jayanti 2023:26 सप्टेंबर वामन द्वादशी आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला भगवान वामन देव अवतरले होते. म्हणून हा दिवस वामन जयंती मानला जातो. दर वर्षी प्रमाणे यंदाही भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षाच्या द्वादशी तिथीला वामन प्रगटोत्सव साजरा करण्यात येतो. सत्ययुगात या तिथीला भगवान विष्णूंनी वामनरूपात अवतार घेतले होते.वामन देव हे भगवान विष्णूचे अवतार होते, म्हणून या तिथीला भगवान विष्णूच्या वामन रूपाची पूजा केली जाते. वामन देव हा भगवान विष्णूचा पाचवा अवतार मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने साधकाला शक्ती, बुद्धी, ज्ञान आणि सुख-समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात.महत्त्व जाणून घ्या 
यावर्षी वामन जयंती 26 सप्टेंबर 2023 रोजी आहे.या दिवशी उपवास केल्याने भगवान वामन सर्व कष्ट दूर करतात.
 
पूजा विधी -
वामन जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून ध्यान करून वामन देवाची मूर्ती एका पाटावर ठेवा. 
वामन अवताराचे चित्र नसल्यास भगवान विष्णूचे चित्र लावता येते. 
यानंतर वामन देवाची विधीपूर्वक पूजा करून व्रताचे संकल्प घ्या.
देवाला रोळी, माऊली, पिवळी फुले, नैवेद्य अर्पण करा.
या दिवशी वामन देव यांना दही आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. दह्यात थोडे केशर मिसळा.
त्यानंतर संध्याकाळी वामन जयंती व्रत कथेचे पठण करावे.  
शेवटी वामन देवाच्या आरतीने पूजेची सांगता करा . 
 
भगवान विष्णूने इंद्र देवाचे राज्य त्यांना परत मिळवून देण्यासाठी प्रह्लादाचा पणतू दैत्यराज बळीचे गर्व हरण करण्यासाठी वामन अवतार घेतला होता. वामन अवतार हा श्री हरींचा मानव रूपातील पहिला अवतार आहे. भगवान विष्णूच्या पहिल्या चार अवतारांनी प्राण्यांचे रूप घेतले. हे चार अवतार आहेत - मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार आणि नरसिंह अवतार आहे.
 
 
 Edited by - Priya Dixit