वसंत पंचमी : देवी सरस्वतीची पूजा करण्याचा सण

Last Modified गुरूवार, 28 जानेवारी 2021 (20:17 IST)
वसंत पंचमीचा सण हिंदूंसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी विद्येची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. हा सण पूर्वी भारतात मोठ्या
उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बायका पिवळे कपडे घालून पूजा करतात. संपूर्ण वर्षाला ज्या सहा हंगामात वाटले आहे, त्यामध्ये वसंत ऋतू हा लोकांचा आवडीचा हंगाम आहे.

या काळात
फुले उमलतात, बहरतात,शेतांमध्ये मोहरीचं सोनं चमकतं, बाली आणि गव्हाचे कणीस बहरतात, आंब्याच्या झाडांवर बौर किंवा कळ्या येतात.सर्वीकडे फुलपाखरे उडू लागतात, तेव्हा वसंत पंचमीचा सण साजरा केला जातो.

वसंत पंचमी कथा-
सृष्टीच्या प्रारंभिक काळात ब्रह्माजींनी भगवान श्रीहरी विष्णू ह्यांच्या आज्ञाने मनुष्य योनी चे निर्माण केले, परंतु ते या रचनेपासून समाधानी नव्हते, तेव्हा त्यांनी विष्णूजींकडून परवानगी घेऊन आपल्या कमंडळु मधून पाणी घेऊन ते पृथ्वी वर शिंपडले, ज्यामुळे पृथ्वीवर कंपन होऊ लागलं आणि त्यामधून एक अद्भुत चतुर्भुजी सुंदर स्त्री प्रकटली. ज्यांच्या एका हातात वीणा आणि दुसरा हात वर देताना होता. आणि इतर दोन्ही हातात पुस्तक आणि माळ होत्या. जेव्हा या सुंदर स्त्रीने आपल्या मधुर वीणेतून स्वर काढले तेव्हा जगातील सर्व प्राणी आणि जीवांना आवाज आला. तेव्हा ब्रह्माजींनी त्या देवीला वाणीची देवी सरस्वती असे नाव दिले.

सरस्वतीला बागेश्वरी,भगवती,शारदा,वीणावादीनी,आणि वाग्देवी अशी अनेक नावाने पुजतात. संगीताची उत्पत्ती त्यांनीच केल्यामुळे त्यांना संगीताची देवी देखील म्हणतात. वसंत पंचमी त्यांचा जन्मोत्सव म्हणून देखील साजरा करतात. पुराणानुसार श्रीकृष्णाने देवी सरस्वतीवर प्रसन्न होऊन त्यांना वर दिले की वसंत पंचमीच्या दिवशी आपली पूजा केली जाईल. याच कारणास्तव हिंदू धर्मात वसंत पंचमीच्या दिवशी विद्येचीं देवी सरस्वती ह्यांची पूजा केली जाते.

सणाचे महत्त्व -
वसंत ऋतूमध्ये मनुष्यच नव्हे तर प्राणी-पक्षी देखील आनंदी होऊ लागतात. तसे तर संपूर्ण माघ महिना खूपच उत्साहवर्धक असतो. तरीही वसंत पंचमी चा सण आपल्या साठी विशेष महत्त्वाचा आहे. प्राचीन काळापासून या दिवशी ज्ञान आणि कलेची देवी आई सरस्वतीचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. म्हणून या दिवशी आई शारदेची पूजा करून त्यांच्या कडून विद्यावान, ज्ञानी होण्याचा आशीर्वाद मागितला जातो. तसेच या दिवशीचे महत्त्व कलाकारांमध्ये देखील आहे. कवी,लेखक,गायक,वादक,नाटककार, नर्तक आपल्या वाद्यांच्या पूजे सह आई सरस्वतीची पूजा करतात.

पूजेची कृती -
या दिवशी सकाळी उठल्यावर हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचे तेलाचे उटणे शरीरावर लावून अंघोळ करावी. नंतर पिवळे कपडे घालून आई शारदेची पूजा करावी. घरात गोड केशरी भात बनवून त्याचा नैवेद्य दाखवून त्याचे सेवन करावे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Mitra Saptami : मित्र सप्तमी का व्रत, भगवान सूर्याला ...

Mitra Saptami : मित्र सप्तमी का व्रत, भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी अशी पूजा करा
सूर्य देव महर्षी कश्यप आणि अदिती यांचा पुत्र असल्याचे म्हटले जाते. सूर्यदेवाच्या ...

मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा

मार्गशीर्ष गुरुवार व्रत कथा
मार्गशीर्षच्या दिवसांमध्ये एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते. या व्रत कथेमागे श्रद्धेचा भाग ...

श्री दत्तक्षेत्र कडगंची

श्री दत्तक्षेत्र कडगंची
औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी पवित्र दत्तस्थाने सगळ्यांनाच परिचित आहेत, पण त्याशिवायही ...

चंपाषष्ठी संपूर्ण माहिती

चंपाषष्ठी संपूर्ण माहिती
श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या ...

तीर्थक्षेत्र जेजुरी

तीर्थक्षेत्र जेजुरी
जेजुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक शहर आहे. हे खंडोबाच्या ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...