शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

या 4 गोष्टी अमलात आणा, धन वाचेल आणि वाढेल

धन कमावणे, धन प्राप्ती होणे हे सुरळीत असले तरी धन वृद्धी आणि बचतीसाठी काही उपाय करणे आवश्यक असतं. अनेक लोकांची तक्रार असते की पैसा हातात तर येतो परंतू खर्च होऊन जातो. काहींना तक्रार असते की पैसा येतच नाही तर वृद्धी कशा प्रकारे होईल. सांसारिक जीवनात अर्थ विना सर्व व्यर्थ आहे. म्हणूनच आज आपण जाणून घ्या असे चार पर्याय ज्याने धन सुरक्षित राहील.
 
हिंदू धर्मग्रंथ महाभारतात विदुर नीती मध्ये लक्ष्मीचा अधिकारी बनण्यासाठी विचार आणि कर्म याशी जुळलेले 4 महत्त्वाचे सूत्र सांगण्यात आले आहे. जाणून घ्या चार प्रकार ज्याने ज्ञानी असो वा अल्पज्ञानी दोघे धनवान बनू शकतात.
 
श्रीर्मङ्गलात् प्रभवति प्रागल्भात् सम्प्रवर्धते।
दाक्ष्यात्तु कुरुते मूलं संयमात् प्रतितिष्ठत्ति।।
या श्लोकाचा अर्थ विस्तारपूर्वक जाणून घ्या:-
 
पहिला मार्ग
चांगले आणि मंगल काम केल्याने स्थायी लक्ष्मी येते. अर्थात परिश्रम आणि ईमानदारीने कमावलेले धन स्थायी टिकतं.
 
दुसरा मार्ग
प्रगल्भता अर्थात धनाचे योग्य प्रबंधन आणि गुंतवणूक व बचत केल्याने धन वृद्धी होते. धन योग्य आय प्रदान करणार्‍या कार्यांमध्ये गुंतवल्यास निश्चित लाभ प्राप्ती होते.
 
तिसरा मार्ग
चातुर्य किंवा समजूतदारीने धन वापरल्यास बचत होते अर्थात विचारपूर्वक, आय-व्ययाचा हिशोब लावून धन वापरल्यास बचत आणि वृद्धी होते. धनाचे संतुलन आवश्यक आहे.
 
चौथा मार्ग
अंतिम सूत्र संयम अर्थात मानसिक, शारीरिक आणि वैचारिक संयम ठेवल्याने धनाची रक्षा होते. याचा अर्थ सुख प्राप्तीसाठी किंवा केवळ शौक पूर्ण करण्यासाठी धनाचा दुरुपयोग करू नये. धन कुटुंबाच्या आवश्यक गरजांसाठी खर्च करावे.
 
तर ही होती विदुर नीती ज्यानुसार धन प्राप्ती, वृद्धी आणि साठवण्याचे चार मार्ग दर्शवले गेले. तसेही धन वाचवण्यापेक्षा धन वृद्धीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. हे ही जाणून घ्या की धन त्या लोकांच्या घरात टिकतं ज्या घरात आनंद, प्रेम, स्वच्छता असते.