शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (19:05 IST)

विदुर नीती : या 3 लोकांना कधीही आपले गुपित सांगू नये

आपल्या जीवनात अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण गुपित ठेवू इच्छितो. पण बऱ्याच वेळा जाणता-अजाणता आपण काही गुपित गोष्टी अशा लोकांना सामायिक करतो विदुराच्या नीतीप्रमाणे ज्या 3 लोकांना सामायिक करायला नको.
 
विदुर हे महाभारतातील महत्त्वाचे पात्र आहे त्यांनी विदुरनीती म्हणून नीती ग्रंथ रचले. या मध्ये समाजाच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी बऱ्याच गोष्टी नीतीच्या स्वरूपात सांगितल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या 3 लोकांना आपले गुपित सांगू नये.  
 
1 लोभी लोकांना चुकून देखील गुपित सांगू नये- 
विदुरच्या नीतीनुसार, जो माणूस लोभी स्वभावाचा असतो, त्याला कधीही आपले गुपित सांगू नये. विदुर सांगतात की असे लोभी माणूस कोणाचेही विश्वासू नसतात. असे लोक थोड्या लोभात येऊन आपला विश्वास तोडतात.  
 
2  हुशार आणि लबाड लोकांना गुपितं सांगू नये- 
विदुर म्हणतात की हुशार आणि लबाड लोकांना कधीही आपले गुपित सांगू नये. असं करणे हानिकारक होऊ शकत. असे लबाड लोकांना आपल्या जीवनात सुद्धा जागा देऊ नये.
 
3 बडबड्या लोकांना गुपित सांगू नये- 
  बडबड्या लोकांना कधीही आपले गुपित सांगू नये. महात्मा विदुर म्हणतात की जास्त बोलणारे लोक सहजपणे एखाद्याच्या भावनांना आणि विचारांना ऐकून वेळ पडल्यास त्याला स्वतःच्या हितासाठी वापरण्याचा प्रयत्न करतात.