सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (09:45 IST)

विनायक चतुर्थी व्रत कथा

एकदा महादेव स्नान केल्यानंतर कैलाश पर्वताहून भोगवती गेले. महादेवांच्या प्रस्थानानंतर देवी पार्वती स्नानसाठी जाताना त्यांनी आपल्या अंगाच्या मळपासून एक बाळ तयार केलं आणि त्यात प्राण फुंकून त्याला सजीव केलं.
 
त्याचं नावं देवीने गणपती असे ठेवलं. पार्वती देवीने अंघोळीला जाताना गणपतीला सांगितलं की मी अंघोळ करत असताना कोणालाही आत येऊ देऊ नको. तेव्हा गणपती बाहेर पहारा देत उभे राहिले. 
 
तेवढ्यात शंकर घरी परतले आणि पार्वतीकडे जायला निघाले तर गणपतीने त्यांना अडवले. महादेवांना हा मुलगा कोण हे ठाऊकच नव्हतं. गणपतीद्वारे आत प्रवेशासाठी थांबवले म्हणून शंकराला राग आला त्यांना याला आपला अपमान झाल्याचे समजत गणपतीचं डोकं उडवलं. 
 
शंकाराला रागाच्या भरात बघून पार्वती देवीला वाटले की त्यांना भोजन वाढण्यात उशिर झाला असावा म्हणून ते नाराज आहेत म्हणून त्यांनी 2 थाळीत भोजन वाढून जेवण्याचा आग्रह केला. दोन ताटं बघून महादेवांनी विचारले की दुसरं ताट कोणाचे आहे? तेव्हा पार्वतीने सांगितले की हे त्यांच्या पुत्र गणेशासाठी आहे, जो दारावर पहारा देत आहे. तेव्हा शंकराने क्रोधित होऊन त्याचं डोकं उडवल्याचं सांगितलं. 
 
हे ऐकून पार्वती देवी विलाप करु लागल्या. त्यांनी शंकरांना डोकं शरीराला जुळवून त्याला जीवित करण्याचा हठ्ठ धरला. तेव्हा महादेवांनी एका हत्तीचं डोकं गणेशाच्या शरीराला जोडले. आपल्या पुत्राला जीवित बघून पार्वती देवी खूप प्रसन्न झाल्या.