शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 21 एप्रिल 2023 (09:30 IST)

गुरुचरित्र वाचण्याचे काय फायदे आहेत?

Shri Datta Ashtakam
‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले.
 
या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे.
या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते.
याने मनुष्य दुःख मुक्त होतो.
घरामध्ये गुरूचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते.
पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात.
विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण,करिअर, आरोग्य, यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो.
आपल्या कुंडलीतील ग्रह-नक्षत्रे, पितृ दोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात.
श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती
अध्याय १- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
अध्याय २- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
अध्याय ३- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
अध्याय ४- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
अध्याय ५- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
अध्याय ६- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
अध्याय ७- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
अध्याय ८- बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
अध्याय ९- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
अध्याय १०- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
अध्याय ११- वाचंदोष तसेच,वेड नाहीसे होते.
अध्याय १२- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
अध्याय १३- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
अध्याय १४- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
अध्याय १५- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
अध्याय १६- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
अध्याय १७- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
अध्याय १८- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
अध्याय १९- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.
अध्याय २०- गुरूस्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!
अध्याय २१- मृत्यूभयापासून मुक्तता .
अध्याय २२- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.
अध्याय २३- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
अध्याय २४- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
अध्याय २५- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
अध्याय २६- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
अध्याय २७ - गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.
अध्याय २८- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.
अध्याय २९- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
अध्याय ३०- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
अध्याय ३१- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
अध्याय ३२- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.
अध्याय ३३- वचनभँग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
अध्याय ३४ - प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
अध्याय ३५ - हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
अध्याय ३६- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
अध्याय ३७- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
अध्याय ३८- निदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
अध्याय ३९- सद्गुगुरु ची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
अध्याय ४०-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
अध्याय ४१- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
अध्याय ४२- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
अध्याय ४३- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.
अध्याय ४४- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
अध्याय ४५- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
अध्याय ४६- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
अध्याय ४७- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
अध्याय ४८-  गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
अध्याय ४९- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.
अध्याय ५०- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
अध्याय ५१- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
अध्याय ५२ - श्रद्धेला  चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.