बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 22 जानेवारी 2024 (09:34 IST)

श्रीराम यांची कुलदेवी कोणती आहे?

ramnavami
Kuldevi of Lord Ram : आयोध्यामध्ये प्रभु श्रीराम यांच्या कुलदेवीचे एक छोटे मंदिर आहे. आयोध्यात 
याची आधारशिला ठेवलेली आहे. असे म्हणतात की श्रीराम यांची कुलदेवी मोठी देवकाली आहे. अशी मान्यता आहे की मोठी देवकाली श्रीराम यांची कुलदेवी होती. आणि ही देवी महाकाली, महालक्ष्मी, आणि महासरस्वतीचा या देवींचे संगम आहे. मंदिराचे महंत सुनील पाठक यांनी सांगितले मोठी देवकाली यांच्या मंदिराबाबत या परिसरात खूप श्रद्धा आहे. मोठी देवकाली श्रीराम यांची कुलदेवी आहे पाठक यांनी देवकालीचे महत्व सांगताना म्हटले की प्रभु श्रीराम यांच्या जन्मानंतर त्यांची आई कौशल्या पूर्ण कुटुंबासोबत मंदिरात आल्या होत्या. त्यानंतर अशी परंपरा बनली आहे जेव्हा पण कोणाच्या घरी बाळ जन्माला येते तेव्हा घरातील सर्व सदस्य बाळाला घेवून मंदिरात दर्शनाला येते. खूप सारे लोक नवीन कार्य सुरु करण्यापूर्वी देवीचे दर्शन घ्यायला मंदिरात येतात. 
 
पाठक यांनी मंदिराबद्दल विस्तृत माहिती देतांना सांगितले की, प्रभु श्रीराम यांचे पूर्वज रघु यांना देवीने स्वप्नात दर्शन दिले होते देवीने त्यांना यज्ञ करण्याचे सांगितले होते आणि युद्धात त्यांचा विजय होईल असे सांगितले. राजा रघु यांनी देवीच्या आदेशाचे पालन करून यज्ञ केला आणि ते युद्धात विजयी झालेत. त्यानंतर त्यांनी मोठी देवकाली मूर्तीची स्थापना केली. 
 
त्यांनी सांगितले की, श्रद्धालु लांब लांबून आपली समस्या तसेच नवस घेवून येतात आणि जेव्हा त्यांची समस्या दुर होते तसेच नवस पूर्ण होतात तेव्हा देवीला धन्यवाद द्यायला येतात तसेच कार्तिकी पौर्णिमा वसंत, शारदीय नवरात्र आणि रामनवमी यदिवशी मोठ्या संख्येत भक्त दर्शनला येतात. 
 
देवकाली मंदिराच्या पुजारीला आशा आहे की, राममंदिरात दर्शनला आलेल्या भक्तांना मोठी देवकाली मंदिराची पण माहिती मिळेल. आयोध्येत श्रीराम मंदिराची आधारशिला ठेवल्यानंतर प्रभु श्रीराम यांची मोठी देवकाली मंदिरात पण भक्तांची संख्या वाढेल अशी आशा आहे. पाठक म्हणालेत की मी अयोध्यावासी आहे याचा माला खूप आनंद आहे की प्रभु श्रीराम यांना त्यांचे स्थान मिळाले प्रभु श्रीराम भारताचे आत्मा आहेत मला असे वाटते की जेव्हा राममंदिराचे दर्शन करण्यासाठी श्रद्धाळू येतील तेव्हा ते मोठी देवकाली मंदिरात पण दर्शनला येतील तसेच श्रद्धाळूंना जेव्हा कळेल की हे मंदिर श्रीराम याच्या परिवारशी जोडलेले आहे तेव्हा ते मोठ्या संख्येने येतील.