शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मार्च 2022 (19:30 IST)

धगधगती होळी आज आहे पेटणार

धगधगती होळी आज आहे पेटणार,
द्वेषाची भावना त्यात जळून खाक होणार,
जे जे नकोय,ते ते टाकावं त्यात,
सगळ्या वाईटाची राख करून टाकू यात,
वर्षानुवर्षे हीच तर परंपरा आहे न आपली,
चाललीच आहे ती, पेटवतात होळी,
गालबोट मात्र त्यास कुणी लावू नये,
अर्थाचा अनर्थ कुणी मात्र काढू नये,
मग बघा येईल, उद्या रंगबेरंगी दुनिया,
रंगच रंग दिसतील, प्रेमाची किमया,
चला तर मग सारेच रंगू प्रेमाच्या रंगात,
आजपासून च तयारीला लागूयात!!
...अश्विनी थत्ते