सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Updated : रविवार, 24 मार्च 2024 (10:09 IST)

Holi 2024 यंदा होळी 24 की 25 मार्च कधी आहे ?

Holi 2024 या वर्षी होळीचा सण साजरा करण्याबाबत खूप संभ्रम आहे, त्यामुळे होळीची नेमकी तारीख काय हे जाणून घ्या. भद्राकाळामुळे होलिका दहन कधी होईल आणि चंद्रग्रहणामुळे होळी कधी साजरी होईल. हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असून हा सण कधी आणि कसा साजरा करावा हे जाणून घ्या-
 
होलिका दहन पौर्णिमा तिथीच्या रात्री केले जाते.
पौर्णिमा तिथी प्रारंभ - 24 मार्च 2024 रोजी सकाळी 09:54 मिनिटापासून. या दिवशी होलिका दहन होईल.
पौर्णिमा तिथी समाप्ती - 25 मार्च 2024 रोजी दुपारी 12:29 मिनिटापर्यंत. या दिवशी धुलेंडी साजरी केली जाईल.
 
होलिका दहन रात्री होत असल्याने 24 तारखेला दहन तर 25 तारखेला धुलेंडी साजरी केली जाणार आहे.
 
होलिका दहन मुहूर्त- 24 मार्च रोजी सकाळी 09.54 ते रात्री 11 वाजून 13 मिनिटापर्यंत भद्राकाळ राहील. यानंतर 11:13 ते 12:27 दरम्यान होलिका दहन करता येईल.
 
- 25 मार्च 2024 रोजी सकाळी 10:24 ते दुपारी 03:01 पर्यंत छायाकल्प चंद्रग्रहण काळ असेल.
- हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा सुतक काळही वैध राहणार नाही.
- होळीचा सण साजरा करायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही.
 
आता पंचमी तिथीबद्दल जाणून घेऊया-
  पंचमी तिथी 29 मार्च 2024 रात्री 08:20 मिनिटापासून सुरू होईल.
पंचमी तिथी 30 मार्च 2024 रोजी रात्री 09:13 मिनिटाला संपेल.