रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By

Holi 2024 : रंगपंचमीसाठी चार सोप्या पद्धतीने बनवा ऑर्गेनिक कलर

Organic Colours for Holi
रंगपंचमी हा रंगाचा सण पूर्ण देशभरात साजरा केला जातो. तसेच सर्व लोक एकमेकांना रंग लावून सण साजरा करतात. तसेच वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद देखील घेतला जातो. रंगपंचमीला खेळले जाणारे रंग हे केमिकल युक्त असतात. जे त्वचेला आणि केसांना नुकसान करतात. अश्यावेळेस तुम्ही आर्गेनिक रंगांचा उपयोग करू शकतात. जे त्वचासाठी चांगले असतात. व हे नैसर्गिक रंग पर्यावरणासाठी देखील सुरक्षित असतात. चला तर जाणून घेऊ या घरी हे रंग कसे बनवावे. 
 
1. पळसाच्या फूलांपासून नारंगी रंग  
रात्री झोपण्यापूर्वी पळसाच्या या फूलांना पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी मग ही फूले पाण्यातून काढून घ्यावी. मग या रंगाच्या पाण्याचा उपयोग रंग खेळण्यासाठी करू शकतात. या नारंगी रंगाने रंग खेळल्यास त्वचा आणि केसांना कोणतेही नुकसान होणार नाही. 
 
2. हळद आणि फूलांपासून पिवळा रंग 
आपल्या घरी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी तुम्ही हळदीचा उपयोग करू शकतात. याकरिता हळद आणि झेंडूच्या फूलांना एकत्रित वाटून घ्या. तसेच त्यामध्ये पाणी मिसळून मिश्रण तयार करा. तसेच बेसन आणि हळदीचा उपयोग देखील करू शकतात. एका वाटीमध्ये हळद आणि बेसन मिक्स करुन त्यामध्ये पाणी टाकून पिवळा रंग तयार करा. 
 
3. गुलाब आणि बीट यापासून गुलाबी रंग 
नैसर्गिक रंग तयार करण्याकरिता तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या आणि चंदन एकत्रित करून रंग तयार करू शकतात. जर तुम्हाला पातळ रंग हवा असेल तर बीट सोबत डाळिंब, गाजर आणि टोमॅटोला चांगल्याप्रकारे बारीक करून मिश्रण तयार करा व या रंगाने रंग खेळू शकतात. 
 
4. चंदन आणि पळसाचे फूल  
नारंगी रंगाचा गुलाल तयार करण्यासाठी चंदनाची पावडर आणि पळसाचे फूल आवश्यक आहेत. यांना समान प्रमाणात एकत्रित करून नारंगी गुलाल तयार करू शकतात. सोबतच, पातळ रंग बनवण्यासाठी पळसाच्या फुलांना वाटून पाण्यात मिक्स करून रंग तयार करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik