शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2016 (14:48 IST)

हॉट किमला चोरांनी लुटले

अमेरिकेतील रिअॅलिटी शोमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी तसेच अनेक टेप्स मुळे जगात प्रसिद्ध असलेल्या मॉडेल किम कर्दाशियन वेस्टच्या डोक्यावर बंदूक रोखून तिला लाखो डॉलर चोरीची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार  पॅरिसमधीलहॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. यात झाले असे की पॅरिस फॅशन वीकसाठी सहभागी होण्यासाठी किम पॅरिसमध्ये गेल्या आठवड्यात दाखल झाली . किमसोबत तिची आई क्रिस जेन्नर, बहीण कोर्टनी कर्दाशियन आणि केन्डल जेन्नर देखील आहेत.  यावेली हॉटेल परिसरात पोलिसांच्या वेशात, चेह-यावर मास्क लावलेल्या दोन अज्ञातांनी तिच्या डोक्यावर बंदूक रोखली. आणि तिच्या कडील असलेलें सोने आणि इतर अनेक गोष्टी घेऊन पोबारा केला आहे.  तिला काही दुखापत नसून पोलीस तपास करत आहे.