क्रिस्टन ठरली 'बेस्ट ड्रेस्ड वूमन'
इमा वॉटसन आणि 'डचेस ऑफ केंब्रिज' केट मिडलटन यांना मागे टाकत लागोपाठ दुसर्या वर्षीही क्रिस्टन स्टीव्हर्टने जागतिक 'बेस्ट ड्रेस्ड वूमन' पुरस्कार पटकावला आहे. आपल्या रॉक-चिक स्टाईलबाबात ग्लॅमर मासिकातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 23 वर्षीय क्रिस्टन पहिल्या क्रमांकावर राहिली. या यादीत हॅरी पॉटर फेम इमा वॉटसन दुसर्या आणि केट मिडलटन तिसर्या स्थानावर राहिली. या वेळीसुद्धा हा पुरस्कार जिंकल्याबद्दल क्रिस्टन खूप खूश आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार पटकावल्यानंतर माझ्यावर पुढच्या वर्षी आपण 'बेस्ट ड्रेस वूमन' ठरू की नाही, असा दबाव निर्मार झाला होता. आता यंदा पुन्हा हा पुरस्कार माझ्या नावे झाल्याने मला खूपद आनंद झाला आहे, असे क्रिस्टन म्हणाली.