रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

सेलेना गोमेजची कमी वयातच डे‍टिंग

हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री सेलेना गोमेज हिने अल्पवयातच डेटिंगला सुरुवात केली होती. लोकांची आपल्यावर नजर आहेआणि ते आपल्याबाबत काय विचार करत असतील, याची त्यावेळी आपल्याला काहीही परवा नव्हती, असे सेलेनाने म्हटले आहे. सेलेना वयाच्या दहाव्या वर्षीच लोकप्रिय झाली होती. त्यावेळी तीने 'बर्नी एँड फ्रेंड्स'या टीव्ही शोमधून आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केला होता.

PR


त्यानंतर गायक निक जोनास आणि जस्टिन बिबर यांच्याशी तीचे सुत जुळे. सेलेना म्हणते, माझे आयुष्य जगताना मी कुणाचीही भीड बाळगत नाही. 14-15 वर्षांची असताना माझे निकसोबत संबंध होते, मात्र तो खर्‍या अर्थाने माझा प्रियकर नव्हताच. जेव्हा तुम्ही तरुण असता, तेव्हा तुम्हाला कोणासोबत राहावे, याची समज आलेली नसते. आपण काय करत आहोत, याची जाणीव होईपर्यंत आपण हे संबंध सुरुच ठेवतो.

सेलेना गोमेझ : Tell Me Something...(पाहा व्हिडिओ)