1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

अमेरिकेतील वंशभेद अद्यापही सुरूच!

जगाला समता, एकोप्याचे धडे गिरविणार्‍या आणि महासत्तेचे विरुद्ध मिरविणार्‍या अमेरिकेत सवंशभेदाची परंपरा अद्यापही संपुष्टात आली नसून, अमेरिकेत घडणार्‍या दर पाच गुन्हांपैकी एक गुन्हा वंशभेदातून घडत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. ज्यू, इस्लाम या धर्माच्या नागरिकांविषयी मोठ्या प्रमाणावर तिरस्काराची भावना असून, गुन्हेगारीमध्ये या नागरिकांचा बळी जात असल्याचे उघड झाले आहे. 2011 मधील आकडेवारी जाहीर झाली असून, त्यात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. सन 2011मध्ये 6,222 वर्णद्वेषाच्या गुन्हांची नोंद झाली आहे. त्याआधीच्या म्हणजे 2010च्या आकडेवारीपेक्षा ही आकडेवारी सहा टक्क्यांनी जास्त आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये शारीरिक व कौटुंबिक छळ, बलात्कार, खून यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.