Last Modified: इस्लामाबाद , बुधवार, 8 ऑगस्ट 2007 (21:57 IST)
दहशतवाद मोडून काढणार: मुशर्रफ
पाकचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी पाकच्या भूमीवर आतंकवादी कारवायांस परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकन संसदपटू रिचर्ड जे डर्बिन यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी सुरक्षा दल कोणतीही परिस्थिती हाताळण्यास समर्थ असल्याची ग्वाही दिली. दोन्ही देशादरम्यानचे संबंध व दहशतवाद निपटण्याबाबतीत मुद्द्यांवर उभयतांमध्ये चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या तस्नीम असलम यांनी दिली. मुशर्रफ यांनी दोन देशांदरम्यान व्यापक व स्थायी संबंध वृद्धींगत करण्यासोबतच दहशतवादाचा बीमोड करण्याचा पाकच्या संकल्पाची पुनरुक्ती केली.