1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

पाकद्वारे 'हत्फ-5' क्षेपणास्त्राची चाचणी

WD
भारतात दूरवर मारा करण्याची क्षमता असलेल्या 'हत्फ-5' या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची काल पाकिस्तानकडून यशस्वी चाचणी करण्यात आली. क्षेपणास्त्राची मारक क्षमता 1,300 किमी असल्याचे, लष्करी अधिकार्‍यांनी सांगितले.

लष्करी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तरल इंधनाने प्रज्वलित होणारे असून, ते आण्विक व पारंपरिक अशाप्रकारचे दोन्ही युद्धभार वाहून नेण्यास सक्षम आहे. 'नॅशनल कमांड अथॉरिटी'च्या नियंत्रणाखाली ही चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तानने या वर्षभरात आठ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी 'हत्फ-7' या 700 किमी मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. भारताने एप्रिलमध्ये 'अग्नी-5' या क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने, पाकिस्तानही नजीकच्या काळात 'हत्फ-5'या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. भारताच्या '‍अग्नी-5' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारताला चीनमध्ये कोठेही हल्ला करणे शक्य आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 1998 नंतर आपल्याकडील अण्वस्त्र क्षमतेमध्ये वाढ केलेली आहे.