महिला नौसैनिकांच्या न्यूड फोटोंमुळे खळबळ
इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबत सायबर क्राइमचे प्रमाणही झपाट्याने वाढत चालले आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचे अश्लील फोटो, व्हिडिओ शेअर करण्याच्या प्रवृत्तीही बळावल्या आहेत.
मरिन्स युनायटेड नावाच्या सिक्रेट ग्रुपमध्ये अशा प्रकारची हजारो छायाचित्रे प्रसारित केली जात असून, त्यात सध्या नौदलात सेवेमध्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या छायाचित्रांचाही समावेश आहे. या ग्रुपमध्ये 30 हजारहून अधिक फॉलोअर्स असून, त्यातून पीडितांवर उत्तेजक आणि अश्लील शेरेबाजी केली जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, यातील दोन डझनहून अधिक पीडित महिलांची ओळख पटली आहे. या अश्लील ग्रुपचे सदस्य असलेल्या व्यक्तीच नव्या सदस्यांना समाविष्ट करू शकतात.