ब्रिटेनच्या मॅनचेस्टर शहरात दहशतवादी हल्ला, 20 जणांचा मृत्यू
ब्रिटनमधील मॅनचेस्टर शहरात सोमवारी रात्री दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले.
या बॉम्बस्फोटांत 20 जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे व्हिक्टोरिया रेल्वे स्टेशनवरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर , एरिना येथे अमेरिकन सिंगर अरियाना ग्रांडेचा म्युझिकल कॉन्सर्ट सुरु असताना भीषण बॉम्बस्फोट झाले.
ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा में यांनी या बॉम्बस्फोटाला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून या हल्लाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.